| ड्वाइट डेव्हिड आयझेनहॉवर |

|
|
| सही |
 |
ड्वाइट डेव्हिड आयझेनहॉवर (इंग्लिश: Dwight David Eisenhower) (ऑक्टोबर १४, इ.स. १८९०; डेनिसन, टेक्सास, अमेरिका - मार्च २८, इ.स. १९६९; वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका) हा अमेरिकेचा ३४वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९५३ ते २० जानेवारी, इ.स. १९६१ या कालखंडात याने अध्यक्षपदाची धुरा वाहिली. दुसर्या जागतिक महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युरोपातील सैन्यांचा सरसेनापती म्हणून याने काम केले. दोस्त सैन्यांच्या ऑपरेशन टॉर्च या इ.स. १९४२-४३ सालांतील उत्तर आफ्रिकेतील युद्धमोहिमेचे आणि पश्चिम आघाडीवरून फ्रान्स व जर्मनी यांवरील इ.स. १९४४-४५च्या यशस्वी आक्रमणाचे नियोजन व नेतृत्व त्याने केले. इ.स. १९५१ साली तो नाटो सैन्याचा सरसेनापती म्हणून नेमला गेला. इ.स. १९५३ सालापर्यंत त्याने ते सरसेनापतित्व सांभाळले.
आयझेनहॉवर याने साम्यवादी प्रसाराविरूद्ध मध्यपूर्वेकडच्या देशांना आणि विशेषत: लेबेनॉनला केलेली सैनिकी आणि आर्थिक मदत आयझेनहॉवर डॉक्ट्रिन या नावाने ओळखली जाते. त्याने कोरियात शांतता प्रस्थापित करणे, रशिया व इतर राष्ट्रांशी निःशस्त्रीकरणाच्या वाटाघाटी करणे, सिअॅटो करार यांसारख्या कामांतून जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबरोबरच त्यांनी अमेरिकेतही कर कमी करणे, कृष्णवर्णीयांच्या समस्या सोडवणे व बेकारी कमी करणे आदींसाठी प्रयत्न केले.
भूषविलेली पदे [संपादन]
प्रकाशित साहित्य [संपादन]
- क्रुसेड्ज इन यूरप
- द व्हाइट हाइस इयर्स
- अॅट ईझ
बाह्य दुवे [संपादन]