Jump to content

हिंदू धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिंदुधर्म या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


हिंदू धर्माशी निगडित लेख
हिंदू धर्म

हिंदू धर्म

हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धर्म वा जीवनपद्धती होय.[] आजही सनातनी हिंदू माणसे स्वधर्माचा हिंदू असा उल्लेख करतात. संस्कृत भाषेत याचा अर्थ 'शाश्वत मार्ग' असा होतो.[] निरीश्वरवाद, सर्वेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, एकेश्वरवाद, नास्तिकता, आदि सर्व रूपे या धर्मात एकत्रितपणे दिसतात. अनेक विद्वानांच्या मते हिंदू धर्म हा विविध भारतीय संस्कृती आणि परंपरांंचे संमिश्रण आहे, की ज्याचा कोणीही संस्थापक नाही.

हिंदू धर्मात अनेक वेगवेगळ्या उपासनापद्धती, मते, तत्त्वज्ञान आणि संप्रदायांचा समावेश आहे. अनुयायांचा संख्येच्या आधारावर हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. जगातील हिंदू धर्मीयांची संख्या साधारण १ अब्ज १२ कोटी एवढी आहे. बहुसंख्यांक हिंदू हे भारत, नेपाळ आणि मॉरिशस ह्या देशांत राहतात. हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत असे म्हणले जाते. त्यापैकी मुख्य त्रिदेव आहेत जे सृष्टीचे उत्पत्ती, पालनपोषण व संहार करतात: १) ब्रह्मदेव, २) विष्णूदेव, ३)भगवान महादेव.

हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे, ज्याचे अंदाजे 1.20 अब्ज अनुयायी आहेत, किंवा जागतिक लोकसंख्येच्या सुमारे 15%, हिंदू म्हणून ओळखले जातात.[] भारत, नेपाळ, मॉरिशस आणि बाली, इंडोनेशियामध्ये हा सर्वात व्यापकपणे व्यक्त केलेला विश्वास आहे. दक्षिण आशियातील इतर देशांमध्ये, आग्नेय आशियामध्ये, कॅरिबियन, मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, युरोप, ओशनिया, आफ्रिका आणि इतर प्रदेशांमध्ये हिंदू समुदायांची लक्षणीय संख्या आढळते.

हिंदू शब्दाची व्युत्पत्ती

[संपादन]

या धर्माची सुरुवात सिंधू नदीच्या पलीकडील भारत देशात झाली आणि बाहेरील देशातील लोक सिंधू नदीच्या पलीकडे लोक म्हणून ओळखत असत. पर्शियन लोक सिंधूचा उच्चार हिंदू असा करीत; कारण पर्शियन भाषेतील 'स' ह्या अक्षराचा अभाव आहे, असे एक मत आहे. तर काही विद्वानांच्या मते, हिंदू हा शब्द सिंधू शब्दापेक्षाही प्राचीन आहे.

ऋग्वेदातील बृहस्पती आगम ह्या भागातील श्लोकात खालीलप्रमाणे उल्लेख आढळतो-

हिमालयं समारभ्य यावद् इन्दुसरोवरं ।
तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते ।।

याचा अर्थ असा की , हिमालयापासून समुद्रापर्यंत पसरलेला हा भूभाग व देवतांनी निर्मिलेला हा देश हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो.

मेरुतंत्र ह्या शैवग्रंथात हिंदू शब्दाची व्याख्या अशी आहे-

हीनंच दूष्यत्येव हिन्दुरित्युच्यते प्रिये ।

याचा अर्थ असा की, जो हीनता आणि अज्ञानतेचा त्याग करतो तो हिंदू.

तर माधवदिग्विजय या ग्रंथात असे आहे-

ओंकारमंत्रमूलाढ्य पुनर्जन्म दृढाशयः ।
गोभक्तो भारतगुरूर्हिन्दुर्हिंसनदूषकः ।।

अर्थात, जो ओमकार नाद करतो, कर्मावर विश्वास ठेवतो, गोभक्ती करतो आणि हिंसेचे निर्दालन करतो तो हिंदू!

इतिहास

[संपादन]

हिंदू धर्म जगातील सर्वात प्राचीन धर्म मानला जातो.

काळाचे वर्गीकरण

[संपादन]

द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया ह्या पुस्तकात जेम्स मिल ह्याने भारताच्या इतिहासाचे हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटिश वसाहत असे संकुचित वर्गीकरण केले होते. ह्या वर्गीकरणामुळे पसरलेल्या गैरसमजुतीमुळे हे वर्गीकरण टीकेस पात्र ठरले. याव्यतिरिक्त हिंदू धर्माचे काळानुसार अजून एक वर्गीकरण आहे. ते असे, "प्राचीन, शास्त्रीय, मध्ययुगीन आणि आधुनिक." याचा विस्तार पुढील प्रमाणे-

धर्माच्या स्वरूपाचे स्वैर विवेचन

[संपादन]

भारतीय संस्कृतीत एकत्रितपणे नांदणाऱ्या वैविध्यपूर्ण पंथांना, संप्रदायांना, समाजांना आणि जीवन पद्धतींना एकत्रितपणे हिंदू धर्म असे संबोधले जाते. हजारो वर्षांच्या काळात या समाजाने एक संस्कृती, जीवनदृष्टी व त्यावर आधारित एक जीवनपद्धती निर्माण केली. हिंदुत्व ही संकल्पना जीवनाकडे पहाण्याचा एक दृष्टिकोन आहे.. निसर्गातील चर, अचर आणि अनेकविध श्रद्धा, संकल्पना आणि मूल्यांच्या पूजांची परंपरा हीसुद्धा या संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. या संपूर्ण संस्कृतीस हिंदू धर्म असे नाव मिळाले.

ऐतिहासिक

[संपादन]

भारतात विविध धार्मिक समजल्या जाणाऱ्या विचारसरणी होत्या. दर्शनशास्त्राचे (तत्त्वज्ञाना)चे वैविध्य होते. चार्वाक, सांख्य, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वैदिक या दर्शनशास्त्रांना मानणारे ऋषी/गुरू असत, आणि गुरुजनांनी सांगितल्याप्रमाणे कौटुंबिक पातळीवर वर्ण-व्यवसाय निहाय जीवनाची उद्दिष्टे आणि जीवनपद्धती स्वीकारल्या जात. सोबतच जैन आणि बौद्ध या धर्म तत्त्वज्ञानांचेही अस्तित्त्व होतेच.

बौद्ध धर्म

[संपादन]

आदि शंकराचार्य यांच्या काळात धार्मिक वादविवाद सत्रांत वैदिकांनी अद्वैत मताचा मोठा पुरस्कार करत वाक्‌पटुतेच्या बळावर वेद प्रामाण्याची पुनःस्थापना केली. आदि शंकराचार्यांनंतरच्या काळात अनेक वर्षांनी भारतभर भक्ती संप्रदायाच्या ज्या चळवळी निर्माण झाल्या, त्या वैदिकांचे अद्वैत मत मोठ्या प्रमाणावर उचलून धरून समाजात पुन्हा वैदिकदर्शन रुजवण्यात साहाय्यभूत ठरल्या. वैदिकांत शाक्त, स्मार्त (शैव) व वैष्णव या मुख्य शाखा असत. परकीय इस्लामी आक्रमण झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी शीख संप्रदायाची स्थापना झाली.

जीवनपद्धतीत वैविध्याचा स्वीकार

[संपादन]

भारतीय धर्म संकल्पनेतील जीवनपद्धतीचा स्वीकार करताना नीतिशास्त्र आणि न्यायशास्त्र यांची सांगड घालणे अभिप्रेत होते. भारतीय संकल्पनेत मुख्य म्हणजे काही अपवाद वगळता विचारप्रणाली आणि जीवनपद्धतीत वैविध्याच्या स्वीकारास मुक्तता होती. मूर्तिपूजा ही याच अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा भाग होता. त्यामुळे कोणत्याही दर्शनशास्त्राचे सबळ तत्त्वज्ञान पाठीशी नसतानासुद्धा भारतातील मूर्तिपूजा ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य ठरले. इतकेच नाही तर, मूर्तिपूजेमुळेच हिंदूधर्मीय ओळखले जाऊ लागले.

वैदिकांचे तत्त्वज्ञान, मूर्तिपूजा, निरीश्वरवादी मते व स्वातंत्र्य

[संपादन]

ज्युडायिक धर्मांमध्ये मूर्तिपूजा नसणे आणि भारतीय जीवन पद्धतीत मूर्तिपूजा ठळकपणे दिसणे, यामुळे भारतीय दर्शनांच्या तात्त्विक बाजूंशी परिचय करून न घेताच परधर्मीयांकडून भारतीयांना हिंदुधर्मी आणि मूर्तिपूजक म्हणून ओळखले जाऊ लागले.

ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मगुरूंनी आपले जीवनविषयक आकलन एखाद्या प्रेषिताच्या शिकवणीपुरते, विशिष्ट धर्मग्रथांपुरते किंवा विचारसरणीपुरते मर्यादित ठेवले आहे, त्यांना हिंदू धर्माच्या व्यापकतेची भीती वाटून त्यांनी त्यापासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला, कारण त्यामुळे त्यांच्या सत्तास्थानाला धोका होऊ शकतो; मग त्यांच्या सोईचे मत त्यांनी हिंदूंवर थोपायला सुरुवात केली.

ज्युडायिक धर्म संकल्पनांनी भारतात त्यांच्या धर्मप्रसारार्थ केलेल्या टीकेस उत्तर देण्याच्या प्रयत्‍नांतून हिंदूंकडून मूर्तिपूजेच्या स्वातंत्र्याचे तात्त्विक समर्थन केले गेले. वैदिकधर्मी खरेतर मूर्तिपूजक नव्हते, तर अग्निपूजक होते. त्यातही निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव मताचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला होता.

वैदिकांच्या तत्त्वज्ञानातील मुख्य विरोधी सांख्यांची दर्शने निरीश्वरवादी असतानासुद्धा द्वैत मताच्या परिणामामुळे हा धर्म पाळणारे लोकच स्वाभाविकतेतील सगुणात्मकता स्वीकारतात. सांख्यांमुळे स्वभाव हाच धर्म व स्वभाव-धर्म. प्रत्येक चराचराचा स्वभाव-धर्म वेगळा आणि त्यातून येणारा अगदी परस्पर विरोधी स्वभाव-धर्मांचा आणि विचारधारांचाही आदर ही धर्माची वेगळीच संकल्पना पुढे आली.

पूर्वमीमांसा ही कर्मकांडाचे (याचा अर्थ मूर्तिपूजेचे असा नव्हे) समर्थन करते तर वैदिक स्वतः मुख्यत्वे निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव वेदांचे प्रामाण्य मानणारे होते. पण त्यांचे वेदप्रामाण्य हे ज्युडायिक धर्मांप्रमाणे ग्रंथ प्रामाण्यावर नाही तर शब्द प्रामाण्यावर विसंबून होते त्यामुळे वैदिक ग्रंथांत समर्थन नसेल किंवा एखाद्या गोष्टीचा विरोध जरी असेल, परंतु प्रत्यक्ष परंपरेतत असेल तर परंपरेच्या समर्थनास वैदिकांनी सहसा विरोध केला नाही. शिवाय ह्या परंपरा पालनांचे जातिनिहायच नव्हे तर कुटुंबनिहाय स्वातंत्र्य असल्यामुळे मूर्तिपूजा आणि इतर पूजांच्या बाबतीत काही ठिकाणी तत्त्वज्ञान आणि वर्तन यात विरोधाभास असूनसुद्धा हिंदू जीवनपद्धतीत सर्वसमावेशकतेवर भर आहे.

व्यक्तिगत स्वातंत्र्य

[संपादन]

ज्युडायिक धर्मांच्या ग्रंथप्रामाण्य आणि सामूहिक प्रार्थना पद्धतीच्या तुलनेत भारतीय दर्शनपद्धती व्यक्तीचा व्यक्तिगत-स्वानुभव-श्रद्धा-प्रचितीस अनन्य महत्त्व प्रदान करते. दुसरा महत्त्वाचा फरक ज्युडायिक धर्ममतांत ईश्वर संकल्पना सर्वत्र आहे, पण सर्वव्यापी नाही. म्हणजे असे की त्यांच्या मतानुसार प्राणिमात्र अचल वस्तूस ईश्वर नियंत्रित करू शकतो पण त्यात अधिवास करू शकत नाही. हे तत्त्व हिंदू धर्माहून वेगळे आहे.

हिंदू संस्कृतीतील धर्माची विचारधारा

[संपादन]

भारतीय विचारधारेत ईश्वर चराचरात अधिवासित तर आहेच पण ईश्वर अथवा ग्रंथ शब्द अशा कोणत्याही प्रामाण्यासोबतच व्यक्तीची व्यक्तिगत श्रद्धा आणि व्यक्तिगत मूल्ये यांवर आधारित, व्यक्तिगत कर्तव्य-धर्माच्या प्रामाण्याचेही प्राबल्य असल्याचे मानले जाते. सोबतच मोक्षप्राप्तीच्या हेतूने चार ऋणांतून मुक्तता; पितृ, मातृ,आणि गुरुजनांच्या आज्ञांचे पालन, व्यक्तिगत, व्यावसायिक, कौटुंबिक कर्तव्ये पार पाडणे, जातिसमूह आणि त्यांच्यांतील परंपरांचे जसेच्या तसे पालन करणे, आदी जीवन पद्धतीतून समतोल साधणे म्हणजेच धर्म अशी धर्माची वेगळी संकल्पना भारतीय विचारधारेत आढळते; हिंदू सांस्कृतिक परंपरेने अगदी गावपातळीपर्यंत सुस्थिर अशी समाजरचना उभी करण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला.

ब्रिटिशोत्तर काळ

[संपादन]

ब्रिटिशपूर्व काळातील भारतातील न्यायव्यवस्थेत राजाचा न्याय अन्तिम असला तरी तो मुख्यत्वे परंपरांवर अवलंबून जातपंचायतींच्या अधीन असे. ब्रिटिशोत्तर काळात कायद्याचे राज्य चालवू इच्छिणाऱ्या न्याय व्यवस्थेला स्थानिक संस्कृतीस अनुसरून कायद्यांची आवश्यकता भासल्यानंतर भारतात राज्यकर्त्यांनी कमीतकमी वापरल्या गेलेल्या वैदिकांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा दिला. ब्रिटिश काळात मॅक्समुल्लर आदी पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनी वेदांतील आर्य या शब्दाचा संबंध मध्ययुरोपी आर्य समुदायाशी लावतानाच संस्कृत व युरोपीय भाषांत साम्य शोधण्याचे प्रयत्‍न केले व वैदिक लोक आणि त्यांचा धर्म पाळणारे हिंदू आणि तसल्या जीवन पद्धतीच्या आधाराने जगणारे स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक भारताच्या बाहेरून आले असावेत असा सिद्धान्त मांडण्याचा प्रयत्‍न केला. परंतु अलीकडील आधुनिक जनुकीय चाचण्यांमध्ये सर्व भारतीय एकाच वंशाचे असून हा सिद्धान्त विज्ञानाच्या कसोट्यांवर टिकत नाही असे आढळून आले आहे.(संदर्भ हवा!)

हिंदू कर्मकांडे

[संपादन]

हिंदू धर्मात पूजापाठादी कर्मे करण्यासाठी अनेक कर्मकांडे निर्माण झाली. या कर्मकांडांसाठी संस्कृत मंत्र म्हणले जातात. अशा मंत्रांतील शब्दांचा अर्थ सांगणारा एक संस्कृत-इंग्रजी शब्दकोश पुणे विद्यापीठातील डॉ. बी.के. दलाई यांनी तयार केला आहे. त्या कोशाचे नाव A Dictionary of Domestic Ritual Terms असे आहे. या कोशात दहा हजारांवर संस्कृत शब्द आणि त्यांच्याशी निगडित क्रिया यांचा समावेश आहे.

हिंदू धर्मशास्त्र

[संपादन]
 
 
 
 
 
 
 
 
 
हिंदू शास्त्रे
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
श्रुति
 
 
 
 
 
 
 
स्मृति
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
ऋग्वेद
 
 
 
 
यजुर्वेद
 
धर्मशास्त्र
 
 
 
 
इतिहास
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सामवेद
 
 
 
अथर्ववेद
 
पुराण
 
 
 
 
षडदर्शने
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
आगम/ तंत्र
 
 
 
वेदांग, उपवेद


हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ श्रुती आणि स्मृती या दोन भागात विभागलेले आहेत. श्रुती हा हिंदू धर्माचा सर्वोच्च ग्रंथ आहे, जो पूर्णपणे अपरिवर्तनीय आहे, म्हणजेच तो कोणत्याही युगात बदलला जाऊ शकत नाही. मेमरी बुक्समध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. श्रुती अंतर्गत वेद: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, ब्रह्मसूत्रे आणि उपनिषदे येतात. वेदांना श्रुती असे म्हणतात कारण हिंदू मानतात की हे वेद देवाने ऋषींना गाढ ध्यानात असताना सांगितले होते. श्रावण परंपरेनुसार गुरूंनी शिष्यांना वेद दिले. प्रत्येक वेदाचे चार भाग असतात- संहिता-मंत्र भाग, ब्राह्मण-ग्रंथ-गद्य भाग, ज्यामध्ये कर्मकांड स्पष्ट केले आहेत, आरण्यक-ज्यामध्ये इतर गूढ गोष्टी स्पष्ट केल्या आहेत, उपनिषद-यामध्ये ब्रह्म, आत्मा आणि त्यांच्या संबंधांची चर्चा केली आहे. . श्रुती आणि स्मृती यांच्यात काही वाद असेल तरच श्रुती वैध असेल. श्रुती वगळता, इतर सर्व हिंदू धर्मग्रंथांना स्मृती म्हणतात, कारण त्यात अशा कथा आहेत ज्या लोक पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतात आणि नंतर लिहितात. सर्व स्मृती ग्रंथ वेदांची स्तुती करतात. ते वेदांपेक्षा कमी आहेत, परंतु ते सोपे आहेत आणि बहुतेक हिंदूंनी वाचले आहे (फार थोडे हिंदू वेद वाचतात). प्रमुख स्मृती ग्रंथ आहेत: - इतिहास - रामायण आणि महाभारत, भगवद्गीता, पुराण, मनुस्मृती, धर्मशास्त्र आणि धर्मसूत्र, आगम शास्त्र. भारतीय तत्त्वज्ञानाचे सहा मुख्य भाग आहेत - सांख्य तत्त्वज्ञान, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत.

वैदिक साहित्य -

  • संहिता म्हणजे मूळ ग्रंथ. संहिता म्हणजे अर्थ संग्रह. याचा अर्थ पदप्रकृति असाही केला जातो. यात स्तोत्रे, काही प्रार्थना आशीर्वादात्मक सूक्ते, मंत्राचे प्रयोग, यज्ञयागांबाबतचे मंत्र, संकट निवारण होण्याबद्दलचे मंत्र व प्रार्थना, देवतांची स्तुती असे घटक येतात.
  • ब्राह्मणे - ब्राह्मणे म्हणजे मोठमोठे गद्य स्वरूपातील ग्रंथ आहेत. यांत देवादिकांच्या विविध प्रकारच्या कथा, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये करायच्या क्रियांचे व्यावहारिक व आध्यात्मिक महत्त्व, यज्ञयागांचे विचार अशा प्रकारचे मुद्दे येतात .
  • आरण्यके व उपनिषदे - यात अरण्यात राहणाऱ्या ऋषी, संन्यासी लोकांचे मनुष्य, जगत् आणि ईश्वर या विषयांच्या अनुषंगाने मांडलेले विचार आढळतात. आपले प्राचीन तत्त्वज्ञान उपनिषदांत सापडते. उपनिषदे हा वेदांचा अन्तिम भाग आणि कर्मांचे अन्तिम ज्ञान आहे . म्हणून त्यांना वेदान्त असेही म्हणले जाते.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Hinduism is variously defined as a "religion", "set of religious beliefs and practices", "religious tradition" etc. For a discussion on the topic, see: "Establishing the boundaries" in Gavin Flood (2003), pp. 1-17. René Guénon in his Introduction to the Study of the Hindu Doctrines (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, proposes a definition of the term "religion" and a discussion of its relevance (or lack of) to Hindu doctrines (part II, chapter 4, p. 58).
  2. ^ The Concise Oxford Dictionary of World Religions. Ed. John Bowker. Oxford University Press, 2000; The modern use of the term can be traced to late 19th century Hindu reform movements (J. Zavos, Defending Hindu Tradition: Sanatana Dharma as a Symbol of Orthodoxy in Colonial India, Religion (Academic Press), Volume 31, Number 2, April 2001, pp. 109-123; हे सुद्धा पहा R. D. Baird, "Swami Bhaktivedanta and the Encounter with Religions," Modern Indian Responses to Religious Pluralism, edited by Harold Coward, State University of New York Press, 1987); less literally also rendered "eternal way" (so Harvey, Andrew. Teachings of the Hindu Mystics. Boulder. xiii.). हे सुद्धा पहा René Guénon, Introduction to the Study of the Hindu Doctrines (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, part III, chapter 5 "The Law of Manu", p. 146. On the meaning of the word "Dharma", हे सुद्धा पहा René Guénon, Studies in Hinduism, Sophia Perennis, ISBN 0-900588-69-3, chapter 5, p. 45
  3. ^ "Hindu Countries 2024". worldpopulationreview.com. 2024-05-31 रोजी पाहिले.