नामकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नामकरण हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सहावा संस्कार आहे. जन्मदिवसापासून १०वे/१२वे दिवशी अपत्याचे नामकरण करावे असा नियम आहे. अन्यथा शुभदिवशी, शुभवारी, शुभयोगावर नामकरण करावे.नक्षत्राच्या अवकहडा चक्राप्रमाणे, जन्मनक्षत्राचे चरणाक्षर घेउन, त्यावर सुरू होणारे नाव, मुलाच्या उजव्या कानात तर मुलीच्या डाव्या कानात सांगावे. त्यावेळेस मंगल वाद्ये वाजवावित. हे जन्मनाव होय. व्यावहारिक नाव वेगळे, ते शुभ असावे. देवतावाचक, नक्षत्रवाचक, इ.चांगले नाव ठेवावे. नावात ऋ, लृ हे स्वर वर्ज्य करावे. पुरुषांच्या नावात समसंख्यांक व स्त्रियांचे नावात विषमसंख्यांक अक्षरे असावी असा सर्वसधारण नियम आहे. बालकाचा जन्म हा कुटुंबातील शुभप्रसंग! त्या बालकाला नाव देण्याचे महत्त्व हिंदू परंपरेत सांगून ठेवले आहे. बालकाचे नाव म्हणजे परमेश्वराच्या एका शक्तीला मारलेली हाक! त्या बालकाकडून त्याच्या आयुष्यातील अपेक्षित कार्याचे नाव! त्या बालकाला नकळत करावयाचे प्रेरणा जागरण! नाव ठेवण्याचा हा मूळ हेतू.[१]

संदर्भ[संपादन]

सुलभ जोतिष शास्त्र-ले.-ज्यो. कृष्णाजी विठ्ठल सोमण

बाह्यदुवे[संपादन]

  • "ज्योतिषशास्त्रीय नामकरण प्रथा". Archived from the original on 2014-07-06. 2014-04-12 रोजी पाहिले.
हिंदू धर्मातील सोळा संस्कार
गर्भाधान  · पुंसवन  · अनवलोभन  · सीमंतोन्नयन  · जातकर्म  · नामकरण  · सूर्यावलोकन  · निष्क्रमण  · अन्नप्राशन  · वर्धापन  · चूडाकर्म  · अक्षरारंभ  · उपनयन  · समावर्तन  · विवाह  · अंत्येष्टी
  1. ^ ज्ञान प्रबोधिनी - संस्कारमाला - नामकरण पोथी