सूर्यावलोकन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूर्यावलोकन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सातवा संस्कार आहे. सूर्याचे तेज आणि ऊर्जा नवजात बालकामध्ये यावी यासाठी त्याला सूर्यदर्शन करण्याची पद्धती आहे. वस्तुतः पूर्वी अंधा-या खोलीत बाळ आणि माता यांची व्यवस्था केलेली असे. त्यामुळे त्यांनी काही काळानंतर प्रकाशाचा, उजेडाचा अनुभव घेणे यासाठी अशी योजना या संस्कारात केली असावी.


हिंदू धर्मातील सोळा संस्कार
गर्भाधान  · पुंसवन  · अनवलोभन  · सीमंतोन्नयन  · जातकर्म  · नामकरण  · सूर्यावलोकन  · निष्क्रमण  · अन्नप्राशन  · वर्धापन  · चूडाकर्म  · अक्षरारंभ  · उपनयन  · समावर्तन  · विवाह  · अंत्येष्टी