समावर्तन
Appearance
समावर्तन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी चौदावा संस्कार आहे. यास सोडमुंज असेही म्हणतात. उपनयनास जो काल शुभ आहे, त्याकाली समावर्तन करावे. गुरुकुलातून अभ्यास संपवून परत स्वतःच्या घरी परत येण्यापूर्वी गुरू सर्व शिष्यांचा समावर्तन संस्कार करीत असत. यावेळी गुरूला दक्षिणा दिली जात असे. मुंज झाल्यावर गुरूच्या घरी शिकायला गेलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी गुरूच्या घरीच रहात असे. त्यामुळे शिक्षण संपल्याची अंतिम अधिकृत परवानगी म्हणूनही या संस्काराकडे पाहिले जायचे. या समयी गुरू आपल्या शिष्याला गृहस्थ आश्रम संबंधात श्रुतिसंमत आदर्शपूर्ण उपदेश करत असत गृहस्थाश्रम प्रवेश करण्यासाठी प्रेरित करतात.
संदर्भ
[संपादन]सुलभ जोतिष शास्त्र-ले.-ज्यो. कृष्णाजी विठ्ठल सोमण
- ज्ञान प्रबोधिनी पौरोहित्य विभाग, पुणे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |