सीमंतोन्नयन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सीमंतोन्नयन हा आश्वलायन गृह्यसूत्र या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे सोळा संस्कारातील चौथा तसेच एक महत्त्वाचा संस्कार आहे. या विधीमध्ये पतीने आपल्या गर्भवती पत्नीचा भंग पाडणे असा विधी अभिप्रेत आहे. आधुनिक काळातील दोहद्पूर्ती किंवा डोहाळेजेवण या प्रथांचे प्राचीन रूप या संस्कारात आहे असे मानले जाते.[१]

स्वरूप[संपादन]

या विधीमध्ये पती सकाळी स्नान- संध्या आणि यज्ञातील आहुती इ. धार्मिक कृत्ये पूर्ण करतो. त्यानंतर साळींदराच्या काट्याने आपल्या तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा भंग पाडतो (म्हणजे काय करतो?). या काट्यावर तीन ठिपके असणे अपेक्षित असते असे नोंदविलेले दिसते. सीमंत (?) म्हणजे भंग आणि उन्नयन म्हणजे उचलणे. अग्नीत आहुती देऊन गर्भवती व गर्भाच्या रक्षणासाठी देवतांना प्रार्थना केल्या जातात. गर्भवती पत्नीच्या मनाचे रंजन होईल असे गायन-वादन इ. कार्यक्रम यानंतर योजावेत असेही सूत्रकार नमूद करतात.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ लेले य.शं, धर्मविधींच्या अंतरंगात, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन
  2. ^ आश्वलायन गृह्यसूत्र


हिंदू धर्मातील सोळा संस्कार
गर्भाधान  · पुंसवन  · अनवलोभन  · सीमंतोन्नयन  · जातकर्म  · नामकरण  · सूर्यावलोकन  · निष्क्रमण  · अन्नप्राशन  · वर्धापन  · चूडाकर्म  · अक्षरारंभ  · उपनयन  · समावर्तन  · विवाह  · अंत्येष्टी