Jump to content

सोळा संस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Samskara (it); ষোড়শ সংস্কার (bn); સંસ્કાર (gu); санскара (ru); सोळा संस्कार (mr); Samskara (de); हिन्दू संस्कार (ne); Samskara (ms); धार्मिक संस्कार (mai); 因果業報 (zh); Samskara (sv); samskara (sl); サンスカーラ (ja); संस्कार (bho); షోడశ సంస్కారాలు (te); สังสการ (th); ഷോഡശക്രിയകൾ (ml); санскара (uk); Samskara (nl); संस्काराः (sa); हिन्दु-संस्कार (hi); ಸಂಸ್ಕಾರ (kn); سناتن دھرم کے سنسکار (ur); Saṃskāra (en); Samskara (eo); samskára (cs); இந்து சமயத்தினரின் 16 சடங்குகள் (ta) obredi prehoda, opisani v statoveških sanskrtskih besedilih (sl); প্রাচীন সংস্কৃত গ্রন্থে বর্ণিত উত্তরণের আচার (bn); พิธีกรรมเปลี่ยนผ่านในศาสนาฮินดู (th); വ്യക്തി, കുടുംബം, സമുദായം, രാഷ്ട്രം, വിശ്വം എന്നിങ്ങനെ പടിപടിയായി എല്ലാ രംഗങ്ങളിലും പരിശുദ്ധിയും ക്ഷേമവും ശാന്തിയും കൈവരിക്കാവുന്ന രീതിയിലുള്ള ഒരു ഒരു കുടുംബാസൂത്രണ പദ്ധതി (ml); हिंदू धर्मातील संस्कार (mr); Rituale im Hinduismus (de); ಒಂದು ಶುದ್ಧೀಕರಣ ಸಮಾರಂಭ (kn); rites of passage described in ancient Sanskrit texts (en); rito de paso (eo); обряди переходу, описані в стародавніх санскритських текстах (uk); riti di passaggio in varie religioni asiatiche (it) hindujski obred prehoda (sl); সংস্কার, হিন্দু সংস্কার (bn); hindu rite of passage (en); संस्कार (hi); санскары (ru); संस्कारः, संस्कार, षोडश संस्काराः (sa)
सोळा संस्कार 
हिंदू धर्मातील संस्कार
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उपवर्गrite of passage,
ritual
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

सोळा संस्कार हे हिंदू धर्मीयांचे संस्कार विधी आहेत. हे संस्कार मानवी मूल्याशी निगडीत बाब आहे. गर्भधारणेपासून ते विवाहापर्यंत हिंदू व्यक्तीवर, आईवडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हणले जाते. सात्त्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा संस्कार विधी करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व संवर्धन करणे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्कारांचा पाया आहे. गुह्यसुत्रामध्ये यावर बरीच चर्चा केली आहे. अनेक ग्रंथामध्ये या संस्काराच्या विषयावर लिखाण केले गेले आहे. हिंदूंच्या पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे. संस्कार हा साधनेचाही विषय आहे. संस्कारामुळे ईश्वराचे स्मरण होते. माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्ती निर्माण व्हाव्यात. त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

हिंदू धर्मातील सोळा संस्कार (षोडश संस्कार) खालिलप्रमाणे आहेत :

  1. गर्भाधान
  2. पुंसवन
  3. अनवलोभन
  4. सीमंतोन्नयन
  5. जातकर्म
  6. नामकरण
  7. सूर्यावलोकन
  8. निष्क्रमण
  9. अन्नप्राशन
  10. वर्धापन
  11. चूडाकर्म
  12. अक्षरारंभ
  13. उपनयन
  14. समावर्तन
  15. विवाह
  16. अंत्येष्टी