अन्नप्राशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.अन्नप्राशन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी नववा संस्कार आहे. जन्मदिवसापासुन, ६/८/९/१० वा १२व्या महिन्यात बालकास अन्नप्राशन करावे. देवतांची पूजा, होम करून व दही, मध, तुप यांनी युक्त अन्न/खीर बालकाला द्यावी.

गृह्यसूत्रे नावाच्या ग्रंथांमध्ये अशा विविध संस्कारांची माहिती दिलेली आहे. मुलाला अन्न भरवून झाल्यानंतर त्याच्या समोर वस्त्र, शास्त्र, ग्रंथ अशा वस्तू मांडून ठेवतात. ज्या वस्तूला मूळ स्पर्श करेल त्या वस्तूच्या संबंधी ते आपला चरितार्थ चालवेल अशी कल्पना मानली गेली आहे. मुलाला तेज, कांती प्राप्त व्हावी म्हणून वडिलांनी त्याला मांस, मासे किंवा भातामध्ये दही, दूध, तूप मिसळून ते द्यावे असे शांखायन स्मृती या ग्रंथात सांगितले आहे. इवलेसे

अन्नप्राशन[संपादन]

March 9, 2016सोळा संस्कार 

१. उद्देश[संपादन]

या संस्काराने आईच्या गर्भात असतांना घडलेल्या मलमूत्रादी भक्षणाचा दोष नाहीसा होतो. 

२. मुहूर्त[संपादन]

मुलास सहावा किंवा आठवा मास आणि कन्येस पाचवा किंवा इतर विषम मास अन्नप्राशनास योग्य आहेत. (सम संख्या पुरुषवाचक, तर विषम संख्या स्त्रीवाचक असतात.) 

३. संकल्प[संपादन]

‘माझ्या बालकाला मातेच्या गर्भातील मलाचे प्राशनापासून झालेल्या दोषांचा नाश, शुद्ध अन्न इत्यादीकांची प्राप्ती, ब्रह्मवर्चसाचा (तेजाचा) लाभ, इंद्रिये आणि आयु यांची सिद्धी, बीजगर्भापासून झालेल्या पापांचे निरसन यांद्वारे श्री परमेश्वराची प्रीती होण्याकरिता ‘अन्नप्राशन’ नावाचा संस्कार करतो. त्याचे अंगभूत श्री गणपतिपूजन, स्वसि्तवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध करतो.’ 

४. विधी[संपादन]

संकल्प झाल्यावर देवतेच्या पुढे आपल्या उजवीकडे शुभ्र वस्त्रावर आईच्या मांडीवर पूर्व दिशेला तोंड करून बसलेल्या बालकास प्रथम अन्नप्राशन करवावे. दही, मध, तूप यांनी युक्त असे अन्न सोन्याच्या अथवा काशाच्या पात्रात ठेवून ‘हे अन्नपते ईश्वरा, आम्हाला आरोग्यकारक आणि पुष्टीदायक अन्न दे’, असे म्हणून सुवर्णयुक्त हस्ताने (हातात सोने घेऊन) अन्न घेऊन पहिला घास द्यावा. मग पोटभर जेवण झाल्यावर मुख धुऊन बालकाला भूमीवर बसवावे. 

५. जीविकापरीक्षा[संपादन]

बालकापुढे पुस्तके, शस्त्रे, वस्त्रे इत्यादी वस्तू उपजीविकेची परीक्षा करण्यासाठी ठेवाव्या. बालक स्वेच्छेने ज्या वस्तूस प्रथमतः हात लावील, ते पुढे त्याचे उपजीविकेचे साधन होईल, असे समजावे.

[१] 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हिंदू धर्मातील सोळा संस्कार
गर्भाधान  · पुंसवन  · अनवलोभन  · सीमंतोन्नयन  · जातकर्म  · नामकरण  · सूर्यावलोकन  · निष्क्रमण  · अन्नप्राशन  · वर्धापन  · चूडाकर्म  · अक्षरारंभ  · उपनयन  · समावर्तन  · विवाह  · अंत्येष्टी
  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला