Jump to content

गोवळकोंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोवळकोंडा

गोवळकोंडा हैदराबाद शहरातील एक प्रसिद्ध किल्ला आहे.

गोवळकोंडा/गोलकोण्डा (कोण्डा=डोंगर)- डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला.

●11 व्या शतकात वरंगलच्या राजा ककातीया प्रतापरुद्रने येथे मातीचा किल्ला बांधला.

●14 व्या शतकात वरंगलच्या लढाईत बहमनी सुलतानाच्या तो ताब्यात आला.

●1518ला पुढे बहमनी कमजोर झाल्यावर जहागीरदार "कुली कुतुब मुल्क" याने स्वतंत्र राज्य घोषित केले. त्यांने मातीचा किल्ला पाडून दगडी किल्ला बांधला. या कामाला 62 वर्षे लागली.

●1687 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला घेतला.


प्रथम किल्याच्या मजबुतीमुळे मुघलांना मुख्य दरवाजा वरून दोन वेळेस परतावे लागले. नंतर त्यांनी कुतुबशहाच्या दोन अंगरक्षकास लाच देऊन, फितुरीने आत शिरले. पुढे किल्ला ताब्यात घेण्यासाठी 8 महिने 9 दिवस लागले. कुतुबशहाला अटक करून किल्ला बेचिराख केला. निजाम लोकांची वफादारी बघून, औरंगजेबाने त्यांना किल्ला आणि हैद्राबाद भेट देऊन निघून गेला.

मुघली तोफांनी तटबंदी, बुरुज, किल्ल्यातील नाजूक महाल यांच्यासोबत एका विशाल वास्तूची, संस्कृतीची आणि सभ्यतेची अक्षरशः राखरांगोळी केली.

17व्या शतकापर्यंत गोवळकोंडा किल्ला ही हिऱ्याची जगप्रसिद्ध बाजारपेठ होती. ज्याने जगाला सर्वोत्तम हिरे दिले. ◆"कोहिनूर(colourless/uk)" {आंध्रच्या कृष्णा नदीत सापडला होता.}

◆"दर्या-ए-नूर(pink/iran)",

◆"आशा का हीरा hope"(blue/us)

◆"Dresden"(green/Germany),

◆"नूर-उल-ऐन"(largest pink/iran),

◆"orlov"(colourless/Russia).

हे सर्व हिरे कुतुबशाहीच्या काळात भारतात होते. पुढे ते परकिय आक्रमणाने जगभर पसरले.

गोवळकोंड्याच्या वैभवशाली इतिहासामुळे अमेरिकेतील (us) तीन विविध प्रांतातील स्थळांची नावे गोवळकोंडा वरून आहेत.

1) नेवाडा(Nevada)- गोवळकोंडा (एक गावं)

2) इलिनोइस(Illinois)- गोवळकोंडा (शहर)

3) एरिज़ोना(arizona)- गोवळकोंडा (खाणी)

बाकी गोवळकोंडा, विजयनगर, देवगिरी अश्या कित्येक उदाहरणावरून सहज पटून जाते की "17व्या शतकापर्यंत भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश होता आणि कोण्या एकेकाळी इथे सोन्याचा धूर निघत होता..