खम्मम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खम्मम
ఖమ్మం జిల్లా (तेलुगू)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
खम्मम जिल्हा चे स्थान
खम्मम जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय खम्मम
मंडळ २१
क्षेत्रफळ
 - एकूण ४,३६१ चौरस किमी (१,६८४ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण १४,०१,६३९ (२०११)
-लोकसंख्या घनता ३२१ प्रति चौरस किमी (८३० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या २२.६%
-साक्षरता दर ६५.९५%
-लिंग गुणोत्तर १०००/ १००५ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ खम्मम
-विधानसभा मतदारसंघ खम्मम, पालेरु, मथिरा, वैरा, सत्तुपल्ली
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,०३६ मिलीमीटर (४०.८ इंच)
वाहन नोंदणी TS–4
संकेतस्थळ


पामुलापल्लीजवळील रथम टेकड्या

खम्मम हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. खम्मम येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

प्रमुख शहर[संपादन]

भूगोल[संपादन]

खम्मम जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,३६१ चौरस किलोमीटर (१,६८४ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा सूर्यापेट, महबूबाबाद, भद्राद्री कोठगुडम जिल्ह्यांसह आणि आंध्र प्रदेश राज्यासह आहेत. जिल्ह्याचा मध्य व पूर्व भाग प्रामुख्याने डोंगराळ आहे. गोदावरी ही येथून वाहणारी प्रमुख नदी आहे.

लोकसंख्या[संपादन]

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्याखम्मम जिल्ह्याची लोकसंख्या १४,०१,६३९ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९७ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६५.९५% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २२.६% लोक शहरी भागात राहतात. [१]

खम्मम जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.[२]

मंडळ (तहसील)[संपादन]

खम्मम जिल्ह्या मध्ये २१ मंडळे आहेत:[३] खम्मम आणि कल्लूरु ही दोन महसूल विभाग आहेत.

अनुक्रम खम्मम महसूल विभाग अनुक्रम कल्लूरु महसूल विभाग
बोनाकल १६ कल्लूरु
चिंतकानी १७ तल्लाडा
रघुनाथपलेम (नवीन) १८ एन्कुरु
खम्मम (ग्रामीण) १९ पेनुबल्ली
खम्मम (शहरी) २० सत्तुपल्ली
कोनिजर्ला २१ वेमसूर
कुसुमंची
मथिरा
मुदिगोंडा
१० नेलकोंडापल्ली
११ कामेपल्ली
१२ सिंगरेनी
१३ तिरुमलायपालेम
१४ वैरा
१५ एरूपालेम


हे देखील पहा[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ https://cdn.s3waas.gov.in/s31c383cd30b7c298ab50293adfecb7b18/uploads/2021/12/2021120268.pdf
  2. ^ "Ministry of Panchayati Raj A NOTE ON THE BACKWARD REGIONS GRANT FUND PROGRAMME" (PDF). Archived from the original (PDF) on 2012-04-05. 2022-01-27 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); line feed character in |title= at position 27 (सहाय्य)
  3. ^ https://khammam.telangana.gov.in/tehsil/