गोळकोंडा एक्सप्रेस
गोलकोंडा एक्सप्रेस तथा गोळकोंडा एक्सप्रेस भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर आणि तेलंगणातील सिकंदराबाद शहरांदरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे. या सेवेला इंटरसिटी एक्सप्रेसचा दर्जा आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या या गाडीला १७२०१ डाउन[१] आणि १७२०२ अप [२] हे क्रमांक आहेत. ही गाडी आपल्या मार्गावरील बव्हंश रेल्वे स्थानकांवर थांबते. या गाडीला ३८३ किमीचा प्रवास करण्यासाठी साधारण ८ तास लागतात.
नाव
[संपादन]या गाडीला हैदराबाद येथील गोवळकोंडा किल्ल्याचे नाव दिलेले आहे.
इतिहास
[संपादन]या गाडीची पहिली धाव इ.स. १९७३मध्ये झाली. त्यावेळी ही गाडी वाफेच्या इंजिनावर चालायची व भारतातील सगळ्यात जलद गाड्यांमधील एक होती.
मार्ग
[संपादन]ही गाडी सिकंदराबाद आणि गुंटुर दरम्यान विजयवाडा, वरंगळ, आणि काझीपेट मार्गे धावते.[३]
वेळ
[संपादन]निर्गमन
स्थानक |
वेळ | आगमन
स्थानक |
वेळ |
---|---|---|---|
गुंटूर | 5:45
(सकाळी) |
सिकंदराबाद | 13:45
(दुपारी) |
सिकंदराबाद
( दुसरी रेक) |
13:05
(दुपारी) |
गुंटूर | 21:20
(रात्री) |
अपघात व दुर्घटना
[संपादन]- २ जुलै २००३ रोजी सकाळी या गाडीचा काही भाग वरंगळजवळील पुलावरून पडला होता. त्यात २१ प्रवासी मृत्यू पावले.
- १९९९ मध्ये वरंगळ जिल्ह्यातील घाणपूर स्थानकात ही गाडी रुळावरून घसरली होती.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ "गोळकोंडा एक्सप्रेस १७,२०१".
- ^ "गोळकोंडा एक्सप्रेस १७,२०२".
- ^ "गोळकोंडा एक्सप्रेस मार्ग". 2015-05-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-10-15 रोजी पाहिले.
- ^ "गौतमी एक्सप्रेस फायर : वारंगल जिल्हा रेल्वे अपघातांचा साक्षीदार".