कामारेड्डी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कामारेड्डी जिल्हा
కామారెడ్డి జిల్లా(तेलुगु)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
कामारेड्डी जिल्हा चे स्थान
कामारेड्डी जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय कामारेड्डी
मंडळ २२
क्षेत्रफळ
 - एकूण ३,६६७ चौरस किमी (१,४१६ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण ९,७२,६२५ (२०११)
-लोकसंख्या घनता २६६ प्रति चौरस किमी (६९० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १२.७१
-साक्षरता दर ५६.५१
-लिंग गुणोत्तर १०००/ १०३३ /
वाहन नोंदणी TS–17
संकेतस्थळ


कामारेड्डी' हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. कामारेड्डी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.[१] जिल्हा निजामाबादच्या जिल्ह्यापासून विभागला गेला आहे आणि ११-१०-२०१६ पासून कामारेड्डी जिल्हा म्हणून स्थापन करण्यात आला आहे. इ.स. १६०० ते १६४० या काळात या भागावर राज्य करणाऱ्या डोमाकोंडा किल्ल्याचा शासक चिन्ना कामारेड्डी यांच्यावरून जिल्ह्याचे नाव कामारेड्डी पडले.

भूगोल[संपादन]

कामारेड्डी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३,६६७ चौरस किलोमीटर (१,४१६ चौरस मैल) आहे. कामारेड्डी जिल्ह्याच्या उत्तरेस निजामाबाद जिल्हा आणि पूर्वेस राजन्ना सिरिसिल्ला जिल्हा आणि सिद्दिपेट जिल्हा, दक्षिणेस मेदक जिल्हा पश्चिमेस महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्हा आणि कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा आहे.

पर्यटन[संपादन]

जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळे

  • निजामसागर धरण, निजामसागर
  • डोमकोंडा किल्ला
  • कौलास किल्ला, कौलास, जुक्कल मंडळ
  • पोचारम प्रकल्प, पोचाराम (गाव), नागरेड्डीपेट मंडळ
  • कौलास नाला प्रकल्प, सावरगाण (गाव), जुक्कल मंडळ
  • मिर्झापूर हनुमान मंदिर, मिर्झापूर (गाव) मदनूर मंडळ.
  • श्री कालभैरव स्वामी मंदिर इसन्नपल्ली (गाव) रामारेड्डी मंडळ.
  • श्री सिद्धरामेश्वर स्वामी मंदिर, भिकनूर
  • श्री साईबाबा मंदिर, नेमली (गाव) बिरकूर मंडळ.
  • श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर, चुक्कापूर (गाव) माचारेड्डी मंडळ
  • थिरुमाला व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, थिम्मपूर (गाव), बिरकूर मंडळ
  • श्री बुग्गा रामा लिंगेश्वर मंदिर, मद्दिकुंटा (गाव) आणि माचारेड्डी मंडळ
  • श्री सोमलिंगेश्वर स्वामी मंदिर, दुरकी (गाव), नसरुल्लाबाद मंडळ
  • अयप्पा स्वामी मंदिर, बिचकुंदा
  • त्रिलिंग रामेश्वर मंदिर तांडूर (गाव) नागिरेड्डीपेट मंडळ
  • श्री राजा राजेश्वर स्वामी मंदिर, बंडा रामेश्वर पल्ले गाव, माचारेड्डी मंडळ
  • संताना वेणुगोपाल स्वामी मंदिर, चिनूर गाव, नागिरेड्डी पेट मंडळ
  • मिनी टाकी बंद कल्की तलाव, बांसुवाडा
  • कौलास इल्लम्मा मंदिर, कौलास गाव, जुक्कल मंडळ
    डोमकोंडा किल्ल्यातील मंदीर

लोकसंख्या[संपादन]

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या कामारेड्डी जिल्ह्याची लोकसंख्या ९,७२,६२५ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १०३३ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ५६.५१% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १२.७१% लोक शहरी भागात राहतात.

२०११ च्या जनगणनेच्या वेळी, ७७.०७% लोकसंख्या तेलुगू, ८.७३% उर्दू, ७.५७% लंबाडी, ३.८९% मराठी आणि ३.२३% कन्नड ही त्यांची प्रथम भाषा बोलत होती.

मंडळ (तहसील)[संपादन]

कामारेड्डी जिल्ह्या मध्ये २२ मंडळे आहेत: बांसुवाडा, कामारेड्डी आणि येल्लारेड्डी ही तीन महसूल विभाग आहेत.

क्रम बांसुवाडा महसूल विभाग क्रम कामारेड्डी महसूल विभाग क्रम येल्लारेड्डी महसूल विभाग
बांसुवाडा १० कामारेड्डी १९ येल्लारेड्डी
बिरकूर ११ भिकनूर २० गांधारी
बिचकुंदा १२ राजमपेट २१ लिंगमपेट
जुक्कल १३ दोमकोंडा २२ नागारेड्डी पेट
मदनूर १४ माचारेड्डी
निजामसागर १५ रामारेड्डी
पिटलाम १६ बीबीपेट
नसरुल्लाबाद १७ ताडवायी
पेद्द कोडपगल १८ सदाशिवनगर

हे देखील पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]