निर्मल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
निर्मल जिल्हा
నిర్మల్ జిల్లా(तेलुगु)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
निर्मल जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय निर्मल
मंडळ १९
क्षेत्रफळ
 - एकूण ३,८४५ चौरस किमी (१,४८५ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण ७,०९,४१८ (२०११)
-लोकसंख्या घनता १८५ प्रति चौरस किमी (४८० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या २१.३८%
-साक्षरता दर ५७.७७%
-लिंग गुणोत्तर १०००/ १०४६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ आदिलाबाद
वाहन नोंदणी TS-18[१]
संकेतस्थळ


निर्मल' हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. निर्मल येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.[२] निर्मल जिल्हा हा पूर्वीच्या आदिलाबाद जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आला आहे. निर्मल जिल्ह्याचे नाव राजा निम्मा रायडू यांच्यावरून पडले आहे, ज्याने या प्रदेशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

प्रमुख शहर[संपादन]

भूगोल[संपादन]

निर्मल जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३,८४५ चौरस किलोमीटर (१,४८५ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा आदिलाबाद, जगित्याल, मंचिर्याल, कुमुरम भीम आसिफाबाद आणि निजामाबाद जिल्‍ह्यांसह महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यासोबत आहेत. हा जिल्हा उत्तर तेलंगणात स्थित आहे.

तेलंगणातील काही सर्वात सुपीक जमिनीचा खजिना जिल्ह्यामध्ये आहे, गोदावरी नदी जिल्ह्याची दक्षिण सीमा बनवते आणि अनेक लहान आणि मध्यम प्रकल्प हे सिंचनाचे प्रमुख स्रोत आहेत. याशिवाय निर्मल नगराभोवती साखळी टाक्या बांधल्या आहेत. भात, कापूस, कडधान्य ही जिल्ह्यातील प्राथमिक पिके आहेत.

पर्यटन आणि संस्कृती[संपादन]

बासरा येथे गोदावरी नदीच्या काठी वसलेले श्री ज्ञान सरस्वती मंदिर आणि कडम धरण ही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत.

बासरा येथील ज्ञान सरस्वती मंदिर

लोकसंख्या[संपादन]

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या निर्मल जिल्ह्याची लोकसंख्या ५,६६,३७६ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १०४६ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ५७.७७% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २१.३८% लोक शहरी भागात राहतात.

२०११च्या जनगणनेच्या वेळी, ६५.५२% लोक तेलुगू, १३.५४% उर्दू, १०.८८% मराठी, ६.४३% लंबाडी आणि १.५२% गोंडी ही त्यांची प्रथम भाषा बोलत होते.

मंडळ (तहसील)[संपादन]

निर्मल जिल्ह्या मध्ये १९ मंडळे आहेत: निर्मल आणि भैंसा हे दोन महसूल विभाग आहेत.[३]

अनुक्रम निर्मल महसूल विभाग अनुक्रम भैंसा महसूल विभाग
दिलावरपूर १३ भैंसा
कड्डम १४ कुबीर
लक्ष्मणचांदा १५ कुंटाल
खानापूर १६ लोकेश्वरम
मामडा १७ मुधोल
निर्मल (शहरी) १८ तानूर
सारंगापूर १९ बासरा
सोन
निर्मल (ग्रामीण)
१० नरसापूर
११ पेंबी
१२ दस्तुरीबाद

हे देखील पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
  2. ^ https://timesalert.com/telangana-new-districts-list/21462/
  3. ^ "TAHSIL | Nirmal District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-30 रोजी पाहिले.