निजामाबाद जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निजामाबाद जिल्हा
నిజామాబాద్ జిల్లా(तेलुगु)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
निजामाबाद जिल्हा चे स्थान
निजामाबाद जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय निजामाबाद
मंडळ २९
क्षेत्रफळ
 - एकूण ४,२८८ चौरस किमी (१,६५६ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण १५,७१,०२२ (२०११)
-लोकसंख्या घनता ३६६ प्रति चौरस किमी (९५० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या २९.५८%
-साक्षरता दर ६४.२५%
-लिंग गुणोत्तर १०००/१०४४ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ निजामाबाद, झहीराबाद
-विधानसभा मतदारसंघ १.निजामाबाद शहरी, २.निजामाबाद ग्रामीण, ३.आर्मूर, ४.बोधन, ५.बालकोंडा
राष्ट्रीय महामार्ग रा.म. ६३, रा.म. ४४
वाहन नोंदणी TS-16[१]
संकेतस्थळ


निजामाबाद जिल्ह्यामधील प्राचीन डोमकोंड मंदिर
निजामाबाद किल्ल्याचे प्रवेशद्वार
पोचरम सरोवर

निजामाबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी निजामाबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. निजामाबाद येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

इतिहास[संपादन]

२ जून-२०१४ पर्यंत निजामाबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता. आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन झाल्यानंतर निजामाबाद जिल्हा तेलंगणा राज्याच्या जिल्ह्यांपैकी एक बनला.

या जिल्ह्याचे नाव निजामाबाद (निजाम-ए-अबादी) हे हैदराबादच्या निजाम असफ जाही, सहावा याच्या नावावरून पडले, ज्याने १८ व्या शतकात दख्खनवर राज्य केले होते, मूळतः जिल्याला इंदूर असे म्हणतात, जे राजा इंद्रदत्त याच्या नावावरून प्रचलित होते ज्याने ५ व्या शतकात या प्रदेशावर राज्य केले.

मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य आणि काकतीय आणि मध्ययुगीन बहामनी सुलतान, कुतुबशाही आणि बरीद शाही आणि आधुनिक काळात मुघल आणि असफ जाही हे काही प्रमुख प्राचीन राजवंश ज्यांनी जिल्ह्यावर आपले राज्य विस्तारले.

१८७६ ​​मध्ये सर सालार जंग-१ च्या पंतप्रधानपदाच्या काळात, निजामाच्या अधिपत्यातील जिल्ह्यांची पुनर्रचना करण्यात आली जिथे इंदूर जिल्हा बनला.

प्रमुख शहर[संपादन]

भूगोल[संपादन]

जनगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,२८८ चौरस किलोमीटर (१,६५६ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा जगित्याल, राजन्ना सिरिसिल्ला, निर्मल, कामारेड्डी जिल्ह्यांसह आणि महाराष्ट्राच्या राज्य सीमेतील नांदेड जिल्ह्यासह आहेत. गोदावरी नदी निजामाबाद जिल्ह्यातून कंदकुर्ती येथे तेलंगणात प्रवेश करते.

पर्यटन[संपादन]

  • श्रीराम सागर प्रकल्प
  • अलीसागर जलाशय
  • अशोक सागर
  • कंदकुर्ती, तडपकल आणि पोचमपाड
  • लिंबाद्री नरसिंहस्वामी मंदिर

लोकसंख्या[संपादन]

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या जनगांव जिल्ह्याची लोकसंख्या १५,७१,०२२ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १०४४ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६४.२५% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २९.५८% लोक शहरी भागात राहतात.

२०११ च्या जनगणनेच्या वेळी, ७१.६२% लोक तेलुगू, १८.२१% उर्दू, ५.६५% लंबाडी आणि २.१६% मराठी भाषा बोलत होते.

मंडळ (तहसील)[संपादन]

नलगोंडा जिल्ह्या मध्ये २९ मंडळे आहेत: बोधन, निजामाबाद आणि आर्मूर ही तीन महसूल विभाग आहेत.[२]

अनुक्रम बोधन महसूल विभाग अनुक्रम निजामाबाद महसूल विभाग अनुक्रम आर्मूर महसूल विभाग
बोधन माक्लूर १९ आर्मूर
रेंजल १० डिचपल्ली २० बालकोंडा
रुद्रूर ११ धरपल्ली २१ भींगल
कोटगिरी १२ इंदलवायी २२ येरगटला
वर्णि १३ मुगपाल २३ मोर्ताड
एडपल्ली १४ नवीपेट २४ मुपकाळ
चंदूर १५ निजामाबाद दक्षिण २५ जक्रमपल्ली
मोसरा १६ निजामाबाद उत्तर २६ कमरपल्ली
१७ निजामाबाद ग्रामीण २७ वेलपूर
१८ सिरिकोंडा २८ मेंदोरा
२९ नंदीपेट

हे देखील पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
  2. ^ "Mandal Offices | Nizamabad District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-30 रोजी पाहिले.