कुमुरम भीम आसिफाबाद जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुमुरम भीम आसिफाबाद
కుమురం భీం ఆసిఫాబాద్ జిల్లా(तेलुगु)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
कुमुरम भीम आसिफाबाद जिल्हा चे स्थान
कुमुरम भीम आसिफाबाद जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय आसिफाबाद
नावाचे मूळ कुमुराम भीम
मंडळ १५
क्षेत्रफळ
 - एकूण ४,८७८ चौरस किमी (१,८८३ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण ५,१५,८१२ (२०११)
-लोकसंख्या घनता १०६ प्रति चौरस किमी (२७० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १६.८६%
-साक्षरता दर ५६.७२%
-लिंग गुणोत्तर १०००/ ९९८ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ आदिलाबाद
-विधानसभा मतदारसंघ आसिफाबाद, सिरपूर
राष्ट्रीय महामार्ग रा.म. ६३
वाहन नोंदणी TS 20
संकेतस्थळ


कुंतला येथे कुमारम भीम यांचे स्मारक

कुमुरम भीम आसिफाबाद (किंवा कोमाराम भीम आसिफाबाद) जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. आसिफाबाद येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. कुमुरम भीम आसिफाबाद जिल्हा हा पूर्वीच्या आदिलाबाद जिल्ह्यापासून बनलेला आहे. गोंड शहीद कोमाराम भीम यांच्या नावावरून नामकरण करण्यात आले.[१]

प्रमुख शहर[संपादन]

  • आसिफाबाद

भूगोल[संपादन]

कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,८७८ चौरस किलोमीटर (१,७७३ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा आदिलाबाद, मंचिर्याल, निर्मल जिल्‍ह्यांसह महाराष्ट्र राज्यासोबत आहेत.

लोकसंख्या[संपादन]

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्याची लोकसंख्या ५,१५,८१२ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९८ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ५६.७२% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १६.८६% लोक शहरी भागात राहतात.[२]

२०११ च्या जनगणनेच्या वेळी, ३८.१०% लोक तेलुगु, २८.०१% मराठी, १२.४८% गोंडी, ७.२८% उर्दू, ३.५९% लंबाडी, ३.०५% कोलामी, २.५५% कोया आणि १.४६% हिंदी भाषा बोलत होते.

२०१८ च्या नीती आयोगाच्या क्रमवारीनुसार हा भारतातील दुसरा सर्वात मागासलेला जिल्हा आहे.[३]

पर्यटन[संपादन]

  • रेब्बाना मंडळातील गंगापूर गावातील प्राचीन श्री बालाजी व्यंकटेश्वर स्वामी देवस्थान हे आसिफाबादपासून १७ किमी अंतर आहे.
  • केरामेरी मंडळाजवळचा ६ किमी लांबीचा उटनूर-आसिफाबाद मार्ग, केरामरी घाट रस्ता, जो केरामरी घाटातून जातो, हा जिल्ह्य़ातील सर्वात जुना रस्ता आहे.
  • प्राचीन नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत, लिंगालापूर मंडळाच्या पित्तलागुडा गावातील सप्तगुंडला धबधबा तेलंगणातील इतर धबधब्यांना-कुंतला आणि पोचेरा धबधब्यांना मागे टाकतो. खरं तर, यात फक्त एक नव्हे तर सात धबधब्यांचा समावेश आहे, म्हणून सप्तगुंडला हे नाव आहे. आसिफाबादपासून १०० किमी अंतरावर आहे.

मंडळ (तहसील)[संपादन]

कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्या मध्ये १५ मंडळे आहेत: आसिफाबाद आणि कागजनगर ही दोन महसूल विभाग आहेत.

अनुक्रम आसिफाबाद महसूल विभाग अनुक्रम कागजनगर महसूल विभाग
आसिफाबाद कागजनगर
लिंगापूर १० पेंचिकलपेट
जैनूर ११ बेज्जूर
तिर्याणी १२ कौटाळा
वानकिडी १३ चिंतालमनेपल्ली
केरमेरी १४ दहेगाव
सिरपूर (यू) १५ सिरपूर (टी)
रेब्बेना

हे देखील पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]