जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ
George Bush Intercontinental Airport
IAH Aerial.jpg
आहसंवि: IAHआप्रविको: KIAH
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक ह्यूस्टन महापालिका
प्रचालक ह्यूस्टन विमानतळ प्रणाली
कोण्या शहरास सेवा ह्यूस्टन
स्थळ ह्यूस्टन
समुद्रसपाटीपासून उंची ९७ फू / ३० मी
गुणक (भौगोलिक) 29°59′04″N 095°20′29″W / 29.98444, -95.34139गुणक: 29°59′04″N 095°20′29″W / 29.98444, -95.34139
संकेतस्थळ www.fly2houston.com/iah
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१५एल/३३आर १२,००१ ३,६५८ सिमेंट
15आर/३३एल ९,९९९ ३,०४८ सिमेंट
९/२७ १०,००० ३,०४८ सिमेंट
८एल/२६आर ९,००० २,७४३ सिमेंट
८आर/२६एल ९,४०२ २,८६६ सिमेंट

जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ (आहसंवि: IAHआप्रविको: KIAHएफ.ए.ए. स्थळसूचक: IAH) हा अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

ह्यूस्टन शहराच्या उत्तरेस २० मैल (३२ किमी)[१][२] असलेला हा विमानतळ ह्यूस्टन खेरीज शुगरलँड-बेटाउन उपनगरांनाही सेवा पुरवतो. १०,००० एकर (४० किमी²)वर पसरलेला हा विमानतळ डॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळामागोमाग टेक्सासमधील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे. याला अमेरिकेच्या ४१व्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशचे नाव देण्यात आलेले आहे.

या विमानतळावरून २०११ साली ४,०१,८७,४४२ प्रवाशांनी ये-जा केली.[३] त्यानुसार हा उत्तर अमेरिकेतील १०व्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ होता. येथे युनायटेड एरलाइन्सचे सगळ्यात मोठे ठाणे असून या विमानकंपनीने येथून १ कोटी ६६ लाख प्रवासी नेले.[४] या विमानतळावर स्पिरिट एरलाइन्सचेही ठाणे आहे.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. About the Airport.
  2. Downtown to IAH. Google Maps. Last accessed April 21, 2008.
  3. Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत.. Houston Airport System.
  4. Airport Fact Sheets, Houston George Bush Intercontinental Airport. युनायटेड एरलाइन्स.