पिट्सबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
पिट्सबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PIT, आप्रविको: KPIT, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIT) हा अमेरिकेच्या पिट्सबर्ग शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून ३० किमी पश्चिमेस ॲलिघेनी काउंटीमध्ये आहे. येथून अमेरिकेतील प्रमुख शहरांना तसेच युरोप आणि उत्तर व दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी डेल्टा एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स, अमेरिकन एरलाइन्स आणि फ्रंटियर एरलाइन्सने प्रवास करतात.