डॅनियेल के. इनॉय आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
(होनोलुलु आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
होनोलुलु आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: HNL, आप्रविको: PHNL, एफ.ए.ए. स्थळसूचक: HNL) हा अमेरिकेच्या हवाई राज्याची राजधानी होनोलुलु येथील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या ५ किमी वायव्येस असलेला हा विमानतळ हवाईयन एरलाइन्स आणि अलोहा एर कार्गोचे मुख्य ठाणे आहे. येथून अमेरिकेतील सर्व प्रमुख शहरे, कॅनडा, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलँड तसेच आशियातील अनेक शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.