Jump to content

ईस्टर्न एर लाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ईस्टर्न एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
ईस्टर्न एरलाइन्स
विमान वाहतूक कंपनी
स्थापना1926 संपादन
कार्य कालावधी (अंत)१८ जानेवारी 1991 संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
हबशार्लट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ संपादन
मालक संस्थाClement Melville Keys, जनरल मोटर्स, एडी रिकेनबाकर, Texas Air Corporation संपादन
मुख्यालयाचे स्थानमायामी संपादन
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले1991 संपादन
IATA airline designatorEA संपादन
ICAO airline designatorEAL संपादन

ईस्टर्न एर लाइन्स अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी होती. मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्य ठाणे असलेली ही कंपनी १९२६मध्ये एडी रिकेनबाकरने स्थापन केली होती. या कंपनीने अमेरिकेच्या पूर्व भागातील विमानवाहतुकीवर वर्चस्व ठेवले होते. विशेषतः न्यू यॉर्क आणि फ्लोरिडादरम्यानच्या वाहतूकीवर १९५० च्या दशकापर्यंत ईस्टर्न एर लाइन्सचा जवळजवळ एकाधिकार होता व नंतरही या दोन ठिकाणांमधील बव्हंश वाहतूक ईस्टर्न एर लाइन्स करायची. १९८० च्या आसपासच्या काही वर्षांत या कंपनीचे नेतृत्व अंतराळवीर फ्रँक बोर्मनने केले. या काळात ईस्टर्न एर लाइन्समधील कामगारांनी केलेल्या चळवळीमुळे व संपामुळे, तसेच कर्जबोजा वाढल्याने कंपनी डबघाईला आली. १९८५मध्ये फ्रँक लॉरेंझोने ही कंपनी विकत घेऊन तिच्या बऱ्याचशा मालमत्ता कॉन्टिनेन्टल एरलाइन्स आणि टेक्सास एरकडे हस्तांतरित केल्या. १९८९मध्ये झालेल्या मोठ्या संपातून सावरता न आल्याने ईस्टर्न एर लाइन्सने १९९१मध्ये दिवाळे काढले.

या कंपनीचे हक्क असलेले बरेचसे मार्ग अमेरिकन एरलाइन्सला मिळाले तर तिची लॉकहीड एल-१०११ विमाने डेल्टा एर लाइन्सने घेतली.

विमानताफा

[संपादन]
१९८९ मध्ये मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इस्टर्न एर लाइन्सचे लॉकहीड एल-१०११-१ विमान
१९९० मध्ये मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इस्टर्न एर लाइन्सचे एरबस ए३००बी४-१०० विमान
१९९० मध्ये मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इस्टर्न एर लाइन्सचे बोईंग ७२७-२०० ॲडव्हान्स्ड विमान

ईस्टर्न एर लाइन्सने आपल्या इतिहासामध्ये अनेक प्रकारची विमाने चालवली आहेत.[१]

इस्टर्न एर लाइन्सचा ऐतिहासिक ताफा
विमान एकूण सुरू झाले निवृत्त झाले नोंदी
एरबस ए३००बी२ २ १९८० १९८८
एरबस ए३००बी४ ३२ १९७७ १९९१ या प्रकारच्या विमानाचा वापर करणारी पहिली अमेरिकन विमान कंपनी
एरो कमांडर ५००बी २ १९६५ १९७५
बोईंग ७२० १५ १९६१ १९७० सर्व विमाने बोईंगला परत केली
बोईंग ७२७-१०० ७५ १९६४ १९९१ लाँच कस्टमर
बोईंग ७२७-२००/ॲडव्हांस्ड ९९ १९६८ १९९१
बोईंग ७४७-१०० ३ १९७१ १९७२ एल-१०११ येण्यापूर्वी पॅन ॲम कडून भाडेतत्त्वावर घेतले
बोईंग ७४७-२००बी अज्ञात colspan=२ रद्द युरोपमधील नियोजित सेवांसाठी, क्वांटास कडून विकत घेतले
एका विमानाचे रंगकाम झाले होते पण ते कधीही सेवेत आले नाही.
बोईंग ७५७-२०० २५ १९८३ १९९१ ब्रिटिश एरवेझ सोबत पहिले गिऱ्हाइक
ब्रेगुएट ९४१ १ १९६८ १९६८ केवळ प्रात्यक्षिकासाठी वापर
कॉनव्हेअर ३४० २ १९७३ १९७४
कॉनव्हेअर ४४० २० १९५७ १९७०
कॉनव्हेअर ६४० ६ १९७३ १९७४
कर्टिस सी-४६ कमांडो २ १९४२ १९४३
कर्टिस काँडोर ६ १९३० १९३६
कर्टिस किंगबर्ड १४ १९३० १९३४
डग्लस डीसी-२ १४ १९३४ १९४१
डग्लस डीसी-३ ७६ १९३६ १९५७
डग्लस डीसी-४ ३८ १९४६ १९६०
डग्लस डीसी-६ ६ १९६७ १९६७
डग्लस डीसी-६बी १० १९५५ १९६२
डग्लस डीसी-७बी ५४ १९५३ १९६६
डग्लस डीसी-८-२१ १६ १९६० १९७९
डग्लस डीसी-८-५१ ३ १९६४ १९७२
डग्लस डीसी-८-५४सीएफ २ १९६५ १९६८ कॅपिटल एर कडून भाडेतत्त्वावर घेतले
डग्लस डीसी-८-६१ १७ १९६७ १९७६
डग्लस डीसी-८-६३पीएफ ६ १९६९ १९७४
फोक्कर एफ-१० २ १९३१ १९३१ जनरल एर लाइन्स कडून भाडेतत्त्वावर घेतले
फोर्ड ट्राय-मोटर ४ १९२९ १९३३
केलेट केडी-१ १ १९३९ १९४०
लॉकहीड मॉडेल १० इलेक्ट्रा ६ १९३५ १९३७
लॉकहीड एल-०४९ कॉन्स्टेलेशन १० १९५६ १९५८
लॉकहीड एल-७४९ कॉन्स्टेलेशन २१ १९४७ १९६१
लॉकहीड एल-१०४९ सुपर कॉन्स्टेलेशन ७६ १९५१ १९६८
लॉकहीड एल-१८८ इलेक्ट्रा ४० १९५९ १९७८ इस्टर्नने मुख्य सेवेमध्ये वापरलेले पहिले आणि एकमेव टर्बोप्रॉप विमान
लॉकहीड एल-१०११-१ ट्रायस्टार ६६ १९७२ १९९१ ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्स सोबत लाँच कस्टमर. इस्टर्न एर लाइन्स फ्लाइट ४०१ अपघातामुळे एक विमान बाद झाले
लॉकहीड जेटस्टार २ १९७० १९७३ केवळ कॉर्पोरेट वापरासाठी
मार्टिन ४-०-४ ६० १९५१ १९६२ या प्रकारच्या विमानांचा वापर करणारी सर्वात मोठी कंपनी
मॅकडोनेल डग्लस डीसी-९-१४ १५ १९६५ १९८०
मॅकडोनेल डग्लस डीसी-९-३१ ७५ १९६७ १९९१
मॅकडोनेल डग्लस डीसी-९-३२ ७ १९८७ १९९१
मॅकडोनेल डग्लस डीसी-९-५१ २६ १९७८ १९९१
मॅकडोनेल डग्लस डीसी-१०-३० ३ १९८५ १९९० पूर्वी अलिटालिया कडे होते. युरोप आणि दक्षिण अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या सेवांसाठी वापरले
पिटकेर्न मेलविंग ५४ १९२७ १९३७ इस्टर्न एर ट्रान्सपोर्ट इंक. म्हणून सेवा सुरू करणारे पहिले विमान
रॉकवेल साब्रेलिनर १ १९६९ १९७०
ट्रॅव्हल एर २००० १ अज्ञात अज्ञात

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ "इस्टर्न एर लाइन्सचा ताफा". aerobernie.bplaced.net. फेब्रुवारी २०, २०२१ रोजी पाहिले.