Jump to content

नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नरिता आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नियंत्रण कक्ष

नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ (जपानी: 成田国際空港; IATA: NRT) हा जपानमधील तोक्यो महानगराला आंतरराष्टीय विमानसेवा पुरवणारा एक विमानतळ आहे. हा विमानतळ तोक्यो स्टेशनच्या ५७ किमी पूर्वेला चिबा प्रांतामधील नारिता ह्या शहरात स्थित आहे. जपानमधील बव्हंशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ह्या विमानतळातून होते. जपान एरलाइन्स, ऑल निप्पॉन एरलाइन्स आणि निप्पॉन कार्गो एरलाइन्स या कंपन्याचा आंतरराष्ट्रीय वाहतूकतळ तसेच जेटस्टार जपान, पीच आणि व्हॅनिला एर या कंपन्यांचा मुख्य वाहतूक तळ येथे आहे. या शिवाय डेल्टा एर लाइन्स आणि युनायटेड एरलाइन्सचा आशियाई वाहतूकतळ नारिता येथे आहे.

प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने नारिता हा जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तोक्यो शहरामधील दुसरा विमानतळ आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°45′53″N 140°23′11″E / 35.76472°N 140.38639°E / 35.76472; 140.38639