आल्बुकर्की आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
आल्बुकर्की आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा आल्बुकर्की आंतरराष्ट्रीय सनपोर्ट (आहसंवि: ABQ, आप्रविको: KABQ, एफ.ए.ए. स्थळसूचक: ABQ) हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्याच्या आल्बुकर्की शहरातील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून फक्त ५ किमी नैऋत्येस असलेला हा विमानतळ राज्यातील सगळ्यात मोठा विमानतळ आहे. २०१४मध्ये ४८,७१,९०१ प्रवाशांनी येथून ये-जा केली होती.
येथून अमेरिकेतील सगळ्या प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.