अमेरिकन एरलाइन्स
| ||||
| स्थापना | १५ एप्रिल, इ.स. १९२६ (अमेरिकन एरवेझ, इंक. या नावाने) | |||
|---|---|---|---|---|
| हब | डॅलस-फोर्ट वर्थ, न्यू यॉर्क-जेएफके, लॉस एंजेलस, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, शिकागो-ओ'हेर, शार्लट, मायामी, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, वॉशिंग्टन-राष्ट्रीय | |||
| मुख्य शहरे | विमानतळ | |||
| फ्रिक्वेंट फ्लायर | ॲडव्हॅंटेज | |||
| अलायन्स | वनवर्ल्ड | |||
| उपकंपन्या | अमेरिकन ईगल | |||
| विमान संख्या | ९३१ | |||
| ब्रीदवाक्य | द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट फ्लायर्स फ्लाय अमेरिकन | |||
| मुख्यालय | फोर्ट वर्थ, टेक्सास, अमेरिका | |||
| प्रमुख व्यक्ती | रॉबर्ट इसॉम (मुख्याधिकारी), डग पार्कर (चेरमन) | |||
| संकेतस्थळ | http://www.aa.com | |||
अमेरिकन एरलाइन्स, इंक. ही अमेरिकेतील एक प्रमुख एरलाइन आहे जिचे मुख्यालय डॅलस–फोर्ट वर्थ मेट्रोप्लेक्समध्ये फोर्ट वर्थ, टेक्सास येथे आहे. ही कंपनी ने-आण केलेले प्रवासी आणि दैनंदिन उड्डाणांच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी विमानकंपनी आहे.[१] तिच्या प्रादेशिक उपकंपन्या आणि अमेरिकन ईगल या नावाखाली काम करणाऱ्या कंत्राटी कंपन्यांसह ४८ देशांमधील सुमारे ३५० गंतव्यस्थानांवर दररोज ६,८०० पेक्षा अधिक उड्डाणांचे विस्तृत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत जाळे चालवते.[२][३] ही विमानकंपनी जगातील तीन प्रमुख एरलाइन युतींपैकी एक असलेल्या वनवर्ल्ड युतीची संस्थापक सदस्य आहे.
अमेरिकन एरलाइन्स आणि अमेरिकन ईगलची दहा मुख्य ठाणी आहेत. यांतील डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ (DFW) हे या एरलाइनचे सर्वात मोठे ठाणे आहे. शार्लोट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ (CLT) हे दुसरे सर्वात मोठे केंद्र असून ते आग्नेय आणि अटलांटिकपार प्रवासासाठीचे प्राथमिक प्रवेशद्वार म्हणून काम करते. मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ (MIA) आणि फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ (PHL) हे तिसऱ्या स्थानावर आहेत: फिलाडेल्फिया हे पश्चिम अमेरिका आणि युरोपमधील उड्डाणांसाठी प्रमुख जोडणी बिंदू म्हणून काम करते, तर मायामी हे कॅरिबियन, दक्षिण अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेच्या प्रवासासाठी प्रमुख केंद्र आहे. ही एरलाइन दरवर्षी २० कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा देते आणि दररोज सरासरी ५ लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. २०२४मध्ये या कंपनीमध्ये १०३,४४० कर्मचारी काम करीत होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ↑ Ranabhat, Sharad (May 12, 2024). "The World's Largest Global Airlines in April 2024". AirwaysMag. डॅलस. February 14, 2025 रोजी पाहिले.
- ↑ "American Airlines Group − About us − American Airlines". Aa.com. August 1, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 22, 2018 रोजी पाहिले.
- ↑ "American Air signs deal to contract out some flying to SkyWest". Yahoo! News. असोसिएटेड प्रेस. September 12, 2012. March 19, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 3, 2012 रोजी पाहिले.