लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ Aeropuerto Internacional de Los Cabos | |||
---|---|---|---|
आहसंवि: SJD – आप्रविको: MMSD
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | ग्रुपो एरोपोर्तुआरियो देल पॅसिफिको | ||
स्थळ | सान होजे देल काबो, बाहा कालिफोर्निया सुर | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ३७४ फू / ११४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 23°09′06″N 109°43′15″W / 23.15167°N 109.72083°W | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
16/34 | ९,८४३ | ३,००० | डांबरी |
सांख्यिकी (२०१३) | |||
एकूण प्रवासी | ३३,८७,४०० ▲ १२.२% | ||
स्रोत: ग्रुपो एरोपोर्तुआरियो देल पॅसिफिको |
लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SJD, आप्रविको: MMSD) मेक्सिकोच्या बाहा कालिफोर्निया सुर राज्याच्या सान होजे देल काबो शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ सान होजे देल काबोसह काबो सान लुकास शहर आणि बाहा कालिफोर्निया सुर राज्याला विमानसेवा पुरवतो.
या विमानतळात तीन टर्मिनले तर चार काँकोर्स आहेत. टर्मिनल १ वर अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा आहे तर टर्मिनल ३ वर आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. प्रवाशांच्या वर्दळीनुसार मेक्सिकोमधील सातव्या क्रमांकाचा असलेल्या या विमानतळातून २०१३मध्ये ३३,८७,४०० प्रवाशांनी ये-जा केली. मागील वर्षापेक्षा १२.२% अधिक असलेल्या या संख्येतून बाहा कालिफोर्नियातील वर्दळीची कल्पना येते. या विमानतळावर सध्या मोठा ताण पडत असून अनेकदा विमानांना जागा मिळणे कठीण होते.
सप्टेंबर १५, इ.स. २०१४ रोजी सान होजे देल काबो शहर व या विमानतळाला हरिकेन ओडिल या चक्रीवादळाने तडाखा दिला. प्रचंड वेगाच्या वाऱ्याने विमानतळावर थांबवलेली विमाने जागची हलून एकमेकांवर आदळली. विमानतळ अनेक दिवस बंद ठेवण्यात आला होता व त्यामळे हजारे प्रवासी येथे अडकून पडले होते. मेक्सिकोच्या सरकारने या प्रवाशांना येथून विनामूल्य तिहुआना, माझात्लान, ग्वादालाहारा आणि मेक्सिको सिटी येथील विमानतळांवर पोचवून तेथून पुढच्या प्रवासाची सोय केली तसेच परदेशी नागरिकांना त्यांच्या वकीलातींशी संपर्क साधण्यासही मदत केली.
विमान कंपन्या आणि गंतव्यस्थाने
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Aeromexico Announces New Services from New York City". 2013-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-११-२७ रोजी पाहिले.
- ^ http://www.applevacations.com/flight-schedule/mci-kansas_city/
- ^ http://airlineroute.net/2014/05/26/dl-sea-nov14/
- ^ "संग्रहित प्रत". 2015-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-18 रोजी पाहिले.
- ^ http://www.chron.com/business/article/Spirit-Airlines-to-add-10-new-nonstop-flights-at-5893355.php
- ^ http://www.suncountry.com/reservations/routemap.shtml
- ^ "UNITED Adds मोसमी Washington - San Jose/Los Cabos Service from late-Dec 2014". २०१४-०७-१५ रोजी पाहिले.