Jump to content

बोईंग ७४७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बोईंग ७४७-४०० या पानावरून पुनर्निर्देशित)
बोईंग ७४७

एर इंडियाचे बोईंग ७४७

प्रकार लांब पल्ल्याचे मोठ्या क्षमतेचे चार इंजिनांचे जेट विमान
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक बोईंग
पहिले उड्डाण फेब्रुवारी ९, इ.स. १९६९[]
समावेश ऑक्टोबर २७, १९८८
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उपभोक्ते ब्रिटिश एरवेझ
जपान एरलाइन्स
कॅथे पॅसिफिक
कोरियन एर
लुफ्तहंसा, एर इंडिया
उत्पादन काळ १९६९-
उत्पादित संख्या १४१६+
प्रति एककी किंमत ७४७-१००: २ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलर (१९६७)
७४७-२००: ३ कोटी ९० लाख डॉलर (१९७६)
७४७-३००: ८ कोटी ३० लाख डॉलर(१९८२)
७४७-४००: २२ कोटी ८० लाख ते २६ कोटी डॉलर (२००७)[]
७४७-८: २८ कोटी ५५ लाख ते ३० कोटी डॉलर (२००७)[][]
उपप्रकार बोईंग ७४७एसपी
बोईंग व्हीसी-२५
बोईंग ७४७-४००
बोईंग ७४७-८
बोईंग ७४७ एलसीएफ

बोईंग ७४७ हे बोईंग कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.[][] जगातील लगेच ओळखल्या जाणाऱ्या काही विमानांपैकी हे एक आहे[] अमेरिकेच्या सियॅटल शहराजवळील एव्हरेट येथे तयार करण्यात येणारे हे विमान जगातील पहिले रुंदाकार आणि दोनमजली विमान आहे. बोईंग ७४७ किंवा जंबो जेट तत्कालीन मोठ्या विमानापेक्षा (बोईंग ७०७) अडीचपट क्षमतेचे होते.[] इ.स. १९७०मध्ये प्रवासी सेवेत रूजू झालेल्या विमानाच्या क्षमतेचा विक्रम एरबस ए-३८०च्या अवतरणापर्यंत ३७ वर्षे अबाधित होता.[]

चार जेट इंजिने असलेल्या या विमानाचा पुढील भाग दोन मजली आहे. हे विमान पूर्ण प्रवासी, मालवाहू किंवा दोन्ही एकातच असलेल्या उपप्रकारात तयार केले जाते. हे विमान तयार करताना बोईंगने मालवाहतुकीसाठी या विमानाचा वापर जास्त होईल असे भाकित केले होते व ४०० प्रति विकल्यावर दुसऱ्या प्रकारच्या विमानांचा खप वाढेल असा अंदाज होता.[] प्रत्यक्षात हे विमान लोकप्रिय ठरले व १९९३मध्ये १,०००वे ७४७ विकले गेले. जून २००९पर्यंत या विमानाचे १,४१६ नग विकले गेले आहेत व अजून १०७ नगांची मागणी आहे.[१०]

बोईंग ७४७-४०० हा सगळ्यात नवीन उपप्रकार जगातील अतिवेगवान प्रवासी विमानांपैकी एक आहे. याची उच्च-अस्वनातीत क्रुझगती[मराठी शब्द सुचवा] .८५ माख (ताशी ५६७ मैल किंवा ताशी ९३७ किमी) आहे. याचा पल्ला ७,२६० समुद्री मैल (८,३५० मैल किंवा १३,४५० किमी) आहे.[११] ७४७-४०० प्रकारच्या प्रवासी विमानात सहसा ४१६ व्यक्ती तीन वर्गात प्रवास करतात तर दोन वर्गांचे विमान ५२४ प्रवासी नेऊ शकते. याचा पुढचा उपप्रकार ७४७-८ २०१२मध्ये लुफ्तांसातर्फे प्रवासीसेवेत रूजू झाले.[१२]

इतिहास

[संपादन]

बोईंग ७४७ची संकल्पना १९६० च्या सुमारास केली गेली. या कालखंडात विमानप्रवासात जगभर मागणी वाढत होती. बोईंग ७०७ आणि डग्लस डीसी-८ सारख्या विमानांनी प्रवासाचा पल्ला लांबपर्यंत नेउन ठेवला होता तरीही ही विमाने तसेच त्याकाळचे विमानतळ वाढत्या मागणीसमोर अपुरी पडायला लागलेले होते. पॅन ॲम या विमानकंपनीने बोईंगला ७०७ च्या दुप्पट क्षमतेचे विमान तयार करण्याचे आव्हान दिले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Rumerman, Judy. "The Boeing 747." Archived 2012-10-07 at the Wayback Machine. U.S. Centennial of Flight Commission. Retrieved: April 30, 2006.
  2. ^ a b Boeing Commercial Airplanes prices, Archived 2012-08-31 at the Wayback Machine. The Boeing Company. Retrieved: 26 June 2007.
  3. ^ Karp, Aaron. "Boeing boosts aircraft prices 5.5% on rising cost of labor, materials." Archived 2008-06-18 at the Wayback Machine. Air Transport World, June 26, 2007. Retrieved: December 17, 2007.
  4. ^ "Woman to build house out of 747." BBC News, April 20, 2006. Retrieved: December 11, 2007.
  5. ^ "Creating Worlds: Adventures Aviation (review)." Amazon.com. Retrieved: December 11, 2007.
  6. ^ "Great Planes-Boeing 747". Archived 2007-03-24 at the Wayback Machine. Discovery Channel. Retrieved: 28 October 2007.
  7. ^ Branson, Richard. "Pilot of the Jet Age." Archived 2016-08-09 at the Wayback Machine. Time, December 7, 1998. Retrieved: December 13, 2007.
  8. ^ "A380 superjumbo lands in Sydney". 2009-06-12 रोजी पाहिले. The superjumbo's advent ends a reign of nearly four decades by the Boeing 747 as the world's biggest airliner.
  9. ^ Wald, Matthew L. 747 "Fleet's Age at Issue During Flight 800 Hearing." New York Times, December 12, 1997. Retrieved: December 17, 2007.
  10. ^ "747 Model Orders and Deliveries data." Archived 2018-09-28 at the Wayback Machine.. The Boeing Company, June 2009. Retrieved: July 4, 2009.
  11. ^ "Technical Characteristics – Boeing 747-400", The Boeing Company. Retrieved: 29 April 2006.
  12. ^ "Orders and Deliveries." The Boeing Company. Retrieved: November 25, 2006.