फोर्ट लॉडरडेल आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Fort Lauderdale, Florida - FLL from airplane.jpg

फोर्ट लॉडरडेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ब्रौआर्ड काउंटीमधील विमानतळ आहे. फोर्ट लॉडरडेल, हॉलिवूड आणि डेनिया बीच या शहरांपासून जवळ असलेला हा विमानतळ कॅरिबियन समुद्रातील क्रुझ प्रवाशांसाठीचा सोयीचा विमानतळ आहे.

येथे स्पिरिट एरलाइन्सचे मुख्य ठाणे असून अलेजियंट एर, जेटब्लू, नॉर्वेजियन लॉंग हॉल आणि साउथवेस्ट एरलाइन्सचेही तळ आहेत.