ह्युस्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ह्युस्टन
Houston
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर

Houston montage.jpg

Flag of Houston, Texas.svg
ध्वज
ह्युस्टन is located in टेक्सास
ह्युस्टन
ह्युस्टन
ह्युस्टनचे टेक्सासमधील स्थान
ह्युस्टन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ह्युस्टन
ह्युस्टन
ह्युस्टनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 29°45′46″N 95°22′59″W / 29.76278°N 95.38306°W / 29.76278; -95.38306

देश Flag of the United States अमेरिका
राज्य टेक्सास
स्थापना वर्ष ५ जून इ.स. १८३७
महापौर ॲनिस पार्कर
क्षेत्रफळ १,५५८ चौ. किमी (६०२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४३ फूट (१३ मी)
लोकसंख्या  
  - शहर २२,९९,४५१
  - घनता १,४७१ /चौ. किमी (३,८१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
http://www.houstontx.gov


ह्युस्टन हे अमेरिका देशातील चौथे मोठे व टेक्सास राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. टेक्सास राज्याच्या पूर्व भागात मेक्सिकोच्या आखाताच्या जवळ १,५५८ चौरस किमी एवढ्या विस्तृत भूभागावर वसलेल्या ह्युस्टन शहराची लोकसंख्या २०१० साली २३ लाख इतकी तर ह्युस्टन-शुगरलँड-बेटाउन ह्या महानगराची लोकसंख्या सुमारे ६० लाख होती.

ह्युस्टन हे अमेरिकेतील अतिप्रगत व सुबत्त शहरांपैकी एक आहे. ऊर्जा, संरक्षण, यांत्रिक उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा हे येथील प्रमुख उद्योग आहेत. जगातील अनेक मोठ्या तेल उत्पादन कंपन्यांची मुख्यालये ह्युस्टनमध्ये आहेत. जगातील सर्वात मोठा हॉस्पिटल-समूह ह्युस्टनच्या टेक्सास मेडिकल सेंटर येथे आहे..

इतिहास[संपादन]

ह्युस्टनची स्थापना ५ जून १८३७ रोजी करण्यात आली व शहराला टेक्सासच्या प्रजासत्ताकाचे माजी राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन ह्यांचे नाव देण्यात आले. येथील बंदर व जलमार्गांमुळे शहराचा झपाट्याने विकास झाला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ह्युस्टन हे कापसाची निर्यात करणारे एक मोठे केंद्र बनले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला येथे खनिज तेलाचा शोध लागला व उर्जा उद्योगाचा एक मोठा हब अशी ह्युस्टनची ख्याती पसरली. येथील व्यापारानुकूल धोरणांमुळे १९७०च्या दशकात अमेरिकेच्या उत्तर व पूर्व भागातील अनेक उद्योग ह्युस्टनमध्ये स्थानांतरित झाले व ह्युस्टनची आर्थिक व लोकसांख्यिक प्रगती चालू राहिली.

शहर रचना[संपादन]

ह्युस्टनचे विस्तृत चित्र

भूगोल[संपादन]

हवामान[संपादन]

ह्युस्टनमधील हवामान दमट व उष्ण आहे. समुद्रकिनारी व वादळी प्रदेशात असल्यामुळे येथे दरवर्षी सरासरी ५४ इंच पाऊस पडतो. येथील वाहतूक पूर्णपणे खाजगी वाहनांवर अवलंबून असल्यामुळे ह्युस्टन अमेरिकेतील सर्वात वायुप्रदूषित शहरांपैकी एक आहे.

ह्युस्टन हॉबी विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 85
(29)
87
(31)
96
(36)
94
(34)
100
(38)
105
(41)
104
(40)
106
(41)
108
(42)
96
(36)
90
(32)
84
(29)
108
(42)
सरासरी कमाल °फॅ (°से) 63.3
(17.4)
67.1
(19.5)
73.6
(23.1)
79.4
(26.3)
85.9
(29.9)
91.0
(32.8)
93.6
(34.2)
93.4
(34.1)
89.3
(31.8)
82.0
(27.8)
72.5
(22.5)
65.4
(18.6)
79.7
(26.5)
सरासरी किमान °फॅ (°से) 45.2
(7.3)
48.2
(9)
54.8
(12.7)
60.6
(15.9)
68.1
(20.1)
73.5
(23.1)
75.3
(24.1)
75.3
(24.1)
71.6
(22)
62.3
(16.8)
53.4
(11.9)
46.7
(8.2)
61.3
(16.3)
विक्रमी किमान °फॅ (°से) 10
(−12)
14
(−10)
22
(−6)
22
(−6)
44
(7)
56
(13)
64
(18)
64
(18)
50
(10)
33
(1)
25
(−4)
9
(−13)
9
(−13)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 4.25
(108)
3.01
(76.5)
3.19
(81)
3.46
(87.9)
5.11
(129.8)
6.84
(173.7)
4.36
(110.7)
4.54
(115.3)
5.62
(142.7)
5.26
(133.6)
4.54
(115.3)
3.78
(96)
५३.९६
(१,३७०.६)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 10.0 7.9 7.6 6.8 7.6 8.6 8.5 9.5 9.0 6.7 8.2 8.7 99.1
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 142.6 155.4 192.2 210.0 248.0 282.0 294.5 269.7 237.0 229.4 168.0 148.8 २,५७७.६
स्रोत #1: NOAA [१]
स्रोत #2: HKO [२]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "NCDC: U.S. Climate Normals" (PDF). National Oceanic and Atmospheric Administration. 2010-04-22 रोजी पाहिले.
  2. ^ "Climatological Normals of Houston". Hong Kong Observatory. 2010-05-11 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: