लुईव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
लुइसव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SDF, आप्रविको: KSDF, एफ.ए.ए. स्थळसूचक: SDF) अमेरिकेच्या केंटकी राज्यातील लुईव्हिल शहराचा विमानतळ आहे. याचे पूर्वीचे नाव स्टँडीफोर्ड फील्ड होते. या नावावरून विमानतळाचा संकेत दिला गेला. येथून अमेरिकेतील निवडक मोठ्या शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून साउथवेस्ट एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.
या विमानतळावरून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही परंतु येथून मालसामानाची आंतरराष्ट्रीय वाहतूक प्रचंड प्रमाणात होते. यूपीएसचा येथे मोठा तळ असून यूपीएस एरलाइन्सद्वारे वर्षाकाठी २३ लाख टनांपेक्षा अधिक सामान या विमानतळातून पसार होते. केंटकी एर नॅशनल गार्डची १२३वी एरलिफ्ट विंग येथे तळ ठोकून आहे. ही तुकडी सी-१३० प्रकारची मालवाहू विमाने चालवते.