पाम स्प्रिंग्ज आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाम स्प्रिंग्ज आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PSPआप्रविको: KPSPएफ.ए.ए. स्थळसूचक: PSP) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील पाम स्प्रिंग्ज शहरात असलेला विमानतळ आहे.

या विमानतळावरून मुख्यत्वे हिवाळ्यात वाहतूक होते. येथून अमेरिकेच्या मध्य व पश्चिम भागातील मुख्य शहरांना तसेच पूर्वेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी अलास्का एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्सचा वापर करतात.