हुआन मनुएल गाल्वेझ विमानतळ
Appearance
हुआन मनुएल गाल्वेझ विमानतळ (आहसंवि: RTB, आप्रविको: MHRO) हा होन्डुरासच्या रोआतान द्वीपावरील विमानतळ आहे. याचे स्पॅनिश नाव एरोपुएर्तो इंटरनॅसियोनाल हुआन मनुएल गाल्वेझ असून यास रोआतान विमानतळ या नावानेही ओळखतात. येथून मुख्यत्वे उत्तर व दक्षिण अमेरिकेस विमानसेवा उपलब्ध आहे. याशिवाय युरोपमधील मिलान विमानतळास मोसमी सेवाही आहे.