कर्नाटक विधानसभा मतदारसंघांची यादी
Appearance
कर्नाटक विधानसभेमध्ये २२४ मतदारसंघांतून निवडून गेलेले सदस्य असतात. याशिवाय कर्नाटकचे राज्यपाल एक ॲंग्लो-इंडियन समाजातील व्यक्तीला नामांकित करतात.
विधानसभेच्या बैठका राज्याची राजधानी बंगळूर येथे होतात. या सभेचे प्रमुख विधानसभा अध्यक्ष तथा स्पीकर असतात. सभेत बहुमत सिद्ध केलेल्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते.
कर्नाटक विधानसभेसाठीची पहिली निवडणूक १९५१ साली झाली. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षास बहुमत मिळून के. चंगलराया रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री झाले.