अँग्लो-इंडियन
Appearance
(ॲंग्लो-इंडियन या पानावरून पुनर्निर्देशित)
अँग्लो इंडियन (Anglo-Indian) हा शब्द प्रथम भारतात राहणाऱ्या ब्रिटिश-भारतीय लोकांसाठी वापरला जातो. आधीच्या काळात ब्रिटिश आणि भारतीय स्त्री-पुरुषांना झालेल्या संततीला ‘युरेशियन’ असे म्हणत. पुढे हा शब्द गेला आणि 'ब्रिटिश पुरुष आणि भारतीय स्त्री' तसेच 'ब्रिटिश स्त्री आणि भारतीय पुरुष' यांच्यापासून झालेल्या संततीला ‘अँग्लो इंडियन’ समाज असे नाव पडले.[१] पूर्वी अँग्लो इंडियन समाजाचे दोन प्रतिनिधी भारतीय संसदेत नेमले जात असे. मात्र डिसेंबर २०१९ मध्ये मोदी सरकारने अँग्लो इंडियन समाजाच्या जागा रद्द करण्याचा निर्णय घेतला.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ "अँग्लो इंडियन समाज". Loksatta. 2018-01-29. 2020-12-04 रोजी पाहिले.
- ^ "मोदी सरकारने इतिहासजमा केलेला लोकसभेतला अँग्लो इंडियन कोटा काय आहे?". kolaj.in (इंग्रजी भाषेत). 2020-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-04 रोजी पाहिले.
- ^ "BBC News हिंदी" (हिंदी भाषेत).