कर्नाटक जनता पक्ष
Jump to navigation
Jump to search
कर्नाटक जनता पक्ष हा भारताच्या कर्नाटक राज्यातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना पद्मनाभ प्रसन्ना यांनी एप्रिल २०११मध्ये केली. २०१२मध्ये कर्नाटकचे भूतपूर्व मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा या पक्षात दाखल झाले २०१३च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या पक्षाला १०% मते मिळाली व २०३पैकी ६ जागांवर विजय मिळवला.
२०१४च्या सुरुवातीस हा पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन झाला परंतु आळंदचे आमदार बी.आर. पाटील यांनी हा पक्ष सोडला नाही. ते कर्नाटक विधानसभेत या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात.