तोरिनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोरिनो
Torino

Collage Torino.jpg
Turin coat of arms.svg
चिन्ह
तोरिनो is located in इटली
तोरिनो
तोरिनोचे इटलीमधील स्थान

गुणक: 45°4′″N 7°42′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश इटली ध्वज इटली
प्रदेश प्यिमाँत
क्षेत्रफळ १३०.२ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ७८४ फूट
लोकसंख्या  
  - शहर ९,१०,१८८
  - घनता ६,९९२ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.torino.it


तोरिनो किंवा तुरिन (इटालियन: Torino, It-Torino.ogg It-Torino.ogg ; प्यिमाँतीज: Turin) ही इटली देशाच्या मधील प्यिमाँत प्रदेशाची राजधानी व उत्तर इटलीमधील एक मोठे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इटलीच्या वायव्य भागात पो नदीच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरिनो शहराची लोकसंख्या २००९ साली ९,१०,१८८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे.

इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात तोरिनोला मानाचे स्थान आहे. येथील कला संग्रहालये, ओपेरागृहे ग्रंथालये, चर्च, उद्याने व भोजनालये प्रसिद्ध आहेत. पर्यटन हा येथील एक मोठा उद्योग असून इटलीमधील पहिल्या दहा व जगातील २५० पर्यटनस्थळांमध्ये तोरिनोची गणना होते. ५८ अब्ज डॉलर इतकी आर्थिक उलाढाल असणारे तोरिनो हे आर्थिक दृष्ट्या इटलीमधील रोममिलानखालोखाल तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. इटलीमधील मोटारवाहन उद्योगाचे तोरिनो हे सर्वात मोठे केंद्र आहे. फियाट कंपनीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.

तोरिनो हे विसाव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे यजमान शहर होते.

अनुक्रमणिका

[संपादन] चित्र दालन

[संपादन] जुळी शहरे

जगातील खालील शहरांसोबत तोरिनोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[१]

[संपादन] हेही पाहा

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये