बुंदेलखंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुंदेलखंडचे भारताच्या नकाशावरील स्थान

बुंदेलखंड हा मध्य भारतामधील एक भौगोलिक प्रदेश व पर्वतरांग आहे. उत्तर प्रदेशमध्य प्रदेश ह्या दोन राज्यांमध्ये बुंदेलखंड प्रदेश पसरला आहे. खजुराहो हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ बुंदेलखंड भागातच स्थित आहे. बुंदेलखंडला अनेक शतकांचा इतिहास असून त्याची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे. हिंदी सोबत येथे बुंदेली भाषा देखील वापरात आहे.

स्वतंत्र राज्य[संपादन]

बुंदेलखंड प्रदेश अविकसित व दुर्लक्षित असून येथील रहिवासी १९६० सालापासून वेगळ्या राज्याची मागणी करत आहेत. बहुजन समाज पक्षाची मायावती, भारतीय जनता पक्षची उमा भारती व इतर अनेक नेत्यांनी बुंदेलखंडला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार असे आश्वासन दिले आहे. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशमधील एकूण १४ जिल्हे स्वतंत्र बुंदेलखंड राज्यासाठी निवडले जाऊ शकतील.

उत्तर प्रदेश[संपादन]

मध्य प्रदेश[संपादन]

प्रसिद्ध बुंदेलखंडी व्यक्ती[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]