Jump to content

अभिजात यामिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(न्युटनी यांत्रिकी या पानावरून पुनर्निर्देशित)
अभिजात यामिकी

न्यूटनचा दुसरा नियम
अभिजात यामिकीचा इतिहास · अभिजात यामिकीची कालक्रमणा

भौतिकशास्त्रामध्ये यामिकीच्या दोन मुख्य शाखांपैकी अभिजात यामिकी ही एक शाखा आहे. या शाखेला न्यूटनची यामिकी म्हणुन देखिल ओळखले जाते. पुंज यामिकी ही यामिकीची दुसरी महत्त्वाची शाखा आहे. अभिजात यामिकीमध्ये विविध बलांमुळे वस्तुंच्या होणाऱ्या हालचालींच्या विषयीच्या नियमांचा अभ्यास केला जातो. न्यूटनचे गतीचे नियम हे या शाखेचा पाया आहे. या शाखेत यंत्रांच्या छोट्या भागांपासुन तारे, ग्रह, दीर्घिका, अवकाशयाने इत्यादी खगोलीय वस्तूंपर्यंत आवाका असणाऱ्या विविध स्थूल वस्तूंच्या गती, परस्परक्रिया यांचा अभ्यास होतो. यंत्रशास्त्रापासून खगोलशास्त्रापर्यंत बऱ्याच क्षेत्रांत अचूक विश्लेषणास उपयोगी ठरणारी ही शास्त्रशाखा विज्ञानतंत्रज्ञानासंबंधित विषयांमधील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या शाखांपैकी एक आहे.

सिद्धांतिक विवेचन

[संपादन]
एसआय साधित "यामिक"
(जे विद्युचुंबकीय किंवा औष्मिक नाहीत)
एकके (किग्रॅ, मी आंइ से
स्थान मी
कोनीय स्थान/कोन एककरहित (त्रिज्यी)
वेग मी·से−१
कोनीय वेग से−१
त्वरण मी·से−२
कोनीय त्वरण से−२
हिसका मी·से−३
"कोनीय हिसका" से−३
विशेष उर्जा मी·से−२
शोषित गुटीचा दर मी·से−३
जडत्व आघूर्ण किग्रॅ·मी
संवेग किग्रॅ·मी·से−१
कोनीय संवेग किग्रॅ·मी·से−१
बल किग्रॅ·मी·से−२
आघूर्ण किग्रॅ·मी·से−२
उर्जा किग्रॅ·मी·से−२
शक्ति किग्रॅ·मी·से−३
दाब आणि उर्जा घनता किग्रॅ·मी−१·s−२
पृष्ठताण किग्रॅ·से−२
स्प्रिंग स्थिरांक किग्रॅ·से−२
irradiance आणि उर्जा प्रवाह किग्रॅ·से−३
kinematic viscosity मी·से−१
dynamic viscosity किग्रॅ·मी−१·से−१
घनता (वस्तुमान घनता) किग्रॅ·मी−३
घनता (वजन घनता) किग्रॅ·मी−२·से−२
संख्या घनता मी−३
कृती किग्रॅ·मी·से−१