कोनीय वेग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भौतिकीत कोनीय वेग, म्हणजे कोनीय विस्थापनामध्ये(कोनाच्या मापामध्ये) होणाऱ्या बदलाचा दर. आणि हे परिमाण सदिश (अचूकरीत्या - भादिश) असून ते परिभ्रमी पदार्थाच्या अक्षाची आणि त्या पदार्थाची कोनीय चाल (परिभ्रमी चाल) दाखविते. कोनीय वेगाचे एसआय एकक म्हणजे त्रिज्यी प्रत्येकी सेकंद(दर सेकंदाला होणारा कोनाच्या मापातील रेडियनीय फरक), तथापि, हे परिमाण अंश प्रत्येकी सेकंद(दर सेकंदी आंशिक फरक), अंश प्रत्येकी तास(दर ताशी आंशिक फरक) इत्यादीमध्येही मोजले जाते. कोनीय वेग ओमेगा (ω, कधीकधी Ω) ह्या चिन्हाने दर्शविला जातो. (त्रिज्यी=रेडियन. हे कोन मोजण्याचे माप आहे. १ रेडियन=(१८० भागिले π) अंश)

कोनीय वेगाची दिशा परिभ्रमी प्रतलाला लंब असते. त्याचप्रमाणे ही दिशा उजव्या हाताचा नियमाने दाखविली जाते.[१]

संदर्भ[संपादन]

  1. {{{शीर्षक}}}. (EM1)