पालगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?पालगड

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर दापोली
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

पालगड हे दापोली तालुक्यातील (रत्‍नागिरी जिल्हा) एक छोटेसे टुमदार गाव आहे. गावाजवळ पालगड किल्ला आहे.

साने गुरुजी ह्यांचा जन्म पालगड येथे झाला. त्यांच्या श्यामची आई ह्या पुस्तकात पालगडचा उल्लेख सतत आढळ्तो. आज गावात साने गुरुजींच्या नावाची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. लवकरच गावात साने गुरुजी स्मारक बांधण्यात येईल.

पालगड गावातील गणपती मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. इ.स. १९९६ साली गणपती मंदिराचा शतसांवत्सरिक महोत्सव साजरा करण्यात आला. पालगड महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने दापोली, खेड, मुंबई, ठाणे, रत्‍नागिरी आणि इतर महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

नागरी सुविधा[संपादन]

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

  1. ^ /https://www.bankofindia.co.in/