इंदूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?इंदूर
मध्यप्रदेश • भारत
गुणक: 22°25′N 75°32′E / 22.42, 75.54
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
३,८९८ चौ. किमी (१,५०५ चौ. मैल)
• ५५३ m (१,८१४ ft)
जिल्हा इंदूर
लोकसंख्या
घनता
१८,३५,९१५ (२००१)
• ४७१/km² (१,२२०/sq mi)
भाषा ,मराठी, हिंदी भाषा, इंग्लिश भाषा,
महापौर उमा शशी शर्मा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४,५२,००१
• +९१-७३१
• MP-09
संकेतस्थळ: www.indore.nic.in

गुणक: 22°25′N 75°32′E / 22.42, 75.54

इंदूर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. भोपाळ ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे.

हे शहर फार पुरातन आहे. पहिल्या बाजीरावांसोबत मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा 'माळवा' या प्रांतातील इंदूर या शहराची जहागिरी त्यांनी मल्हारराव होळकर यांना दिली. त्या नंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा खंडेराव हा युद्धात मारल्या गेल्यावर त्यांच्या सुनेने - अहिल्याबाई होळकर यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंचा महेश्वरचा राजवाडा अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.

इंदूरच्या मध्यात उभा असलेला होळकरांचा राजवाडा आजही मराठी साम्राज्याचा इतिहास सांगतो.

शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे आणि तापमान विषम आहे, म्हणजे हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप गरम.

वैशिष्ट्ये[संपादन]

इंदूर शहर तसे फार पसरलेले आहे. पण वाहतूक व्यवस्था फार स्वस्त आहे. शहर जुने आणि नवे असं दोन भागात आहे. जुने गाव म्हणजे राजवाड्याच्या मागे. येथील कापड बाजार माहेश्वरी व चंदेरी साड्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. तसेच खजराना नावाच्या भागात पुस्तकांचा बाजार आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भरणारा चाट बाजार (ऊर्फ सराफा). येथे संध्याकाळी सराफ बाजार बंद झाल्यावर त्या समोरच खाद्य पदार्थांची दुकाने लागतात. छप्पन भोग नावाच्या एका भागात मिठायांची दुकाने आहेत.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

 • सिद्धकाली मंदिर
 • गोमतगिरी - जैन तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदर आहे. येथील भव्य फरसबंद आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती आहे.
 • नखराली ढाणी - इंदूर ते महू रस्त्यावर राऊमध्ये १९९५ पासून वसलेले, एक संस्कृती-ग्राम-निकेतन आहे. येथे प्रवेश करण्यासाठी शुल्क आहे. मात्र त्यात भोजनही समाविष्ट आहे. येथे राहण्याचीही व्यवस्था आहे.
 • अन्नपूर्णा मंदिर - येथे प्रशस्त वेदपाठशाळा (वेदविद्यापीठ) वेदमंदिर सभागृह आहे. येथे मूर्तिरूप वेद आहेत. येथील अन्नपूर्णा देवीची यात्रा त्र्यंबकेश्वर येथे जाते.
 • काचमंदिर
 • जुना राजवाडा - हा वाडा होळकर घराण्याचा असून सात मजली आहे.
 • मल्हारी मार्तंड मंदिर - शिवलिंग, मध्यभागी गणेशमूर्ती व नटराजमूर्ती येथे विराजमान आहेत. येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती आहे. होळकरांच्या राजघराण्याचे तपशील असलेले फलक येथे आहेत.
 • लालबाग महाल
 • महेश्वर - सहस्रधारा धबधबा
 • पाताळपाणी
 • अहिल्येश्वर मंदिर - कातळात उत्तम नक्षीकाम असलेली अनेक भित्तिशिल्पे हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिरातून नर्मदा नदीत उतरणारा घाट आहे.
 • बाणेश्वर
 • सहस्रार्जुन मंदिर - महिष्मती या नगरीचा प्राचीन सम्राट
 • श्री दत्त मंदिर हरसिद्धि क्षेत्र - येथे वासुदेवानंद सरस्वती महाराज यांचे गंडाबंधन झाले होते.
 • इंदूरचे महाराष्ट्र मंडळ व त्यांचे ग्रंथालय

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]