जागतिक बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉशिंग्टन डी.सी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील जागतिक बँकेच्या मुख्यालयाची इमारत.

जागतिक बँक (इंग्लिश: World Bank, वर्ल्ड बँक) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना डिसेंबर २७, इ.स. १९४५ मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती (इंग्लिश: Bretton Woods System) समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देशविकसनशील देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.

गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.

जागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :

शिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे.

भारतासहित अनेक देशांना या बँकेने विवीध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. पैकी भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे.

इ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने मेक्सिकोइंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थीक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.

अनुक्रमणिका

विरोधी बाजू [संपादन]

याच वेळी बॅंकेचे विरोधक असेही म्हणतात की बँकेची काही लपवलेली उद्दीष्टेही आहेत. जसे की दुसऱ्या महायुद्धा नंतर साम्राज्य लयाला जात चाललेल्या इंग्लंड ला नवीन आर्थीक साम्राज्य उभारण्यासाठी या बॅंकेचा उपयोग करून घेतला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष व अर्थतज्ज्ञ जोसेफ स्तिगलित्झ (इंग्रजी:Joseph E. Stiglitz) यानीही इ.स. १९९९ मध्ये बँकेच्या उद्दीष्टांशी सुसंगत नसलेल्या धोरणांवर टीका केली होती.

बाह्य दुवे [संपादन]

समर्थक बाह्य दुवे [संपादन]


विरोधी बाह्य दुवे [संपादन]



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.