भात
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात. महाराष्ट्राच्या काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदूळ या अर्थाने पण होतो. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण, तसेच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.
भात शिजतानाचे आधणाचे (गरम) पाणी काढतात, त्यास पेज असे म्हणतात. शिजलेला भात विविध स्वरुपात खाल्ला जातो. साधा भात हा वरण (डाळ), आमटी, सांबार, पातळ पालेभाजी, दूध, दही इ. बरोबर खाल्ला जातो. खिचडी, चित्रान्न, नारळी भात, पुलाव, बिर्याणी हे भाताचे प्रकार आहेत.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |