डच ईस्ट इंडिया कंपनी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डच ईस्ट इंडिया कंपनी (व्हेरीनिग्डे ऊस्टइंडिश कंपनी, शब्दशः - संघटित पूर्व भारतीय कंपनी) ही नेदरलँड्सस्थित व्यापार कंपनी होती.
इ.स. १६०२मध्ये नेदरलँड्सने या कंपनीला आशियामध्ये वसाहती निर्माण करण्याचा २१ वर्षांचा मक्ता दिला. ही जगातील सर्वप्रथम बहुराष्ट्रीय कंपनी होती. डच ईस्ट इंडिया कंपनी रोखे विकणारी जगातील सर्वप्रथम कंपनी होती.

