सुमात्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुमात्रा इंडोनेशियातील एक मोठे बेट आहे. हे आकारानुसार जगातील सहाव्या क्रमांकाचे बेट आहे. याचा विस्तार ४,७०,००० किमी आहे.

सुमात्रा बेटाचा स्थानदर्शक नकाशा


[संपादन] नावाची व्युत्पत्ती

प्राचीन काळात सुमात्राला सुवर्णद्वीप किंवा सुवर्णभूमी या संस्कृत नावांनी ओळखले जायचे. हे नाव कदाचित तेथील सापडणार्‍या सोन्यामुळे असावे.[१] अरब नकाशेकारांनी इसवी सनाच्या १० ते तेराव्या शतकात याचे नाव लामरी (लामुरी, लांब्री किंवा रामनी) असल्याचे नमूद केले होते. सुमात्रा हे नाव इसवी सनाच्या १४व्या शतकात रूढ झाले. हे नाव समुद्र वंशाच्या राजांमुळे पडले. इसवी सनाच्या १९व्या शतकात युरोपीय लेखकांच्या मते सुमात्रात राहणार्‍या लोकांना आपल्याच बेटाचे नाव माहिती नव्हते.[२]


[संपादन] इतिहास

इ.स.पू. ५००च्या सुमारास ऑस्ट्रोनेशियन भाषा बोलणारी लोक सुमात्रात आली. भारत-चीन सागरी मार्गावर असल्यामुळे येथे त्यानंतर अनेक गावे वसली. विशेषतः पूर्व किनार्‍यावरील या वसाहतींवर भारतातील धर्मांचा प्रभाव होता.

[संपादन] संदर्भ

  1. ड्रकार्ड, जेन (१९९९). A Kingdom of Words: Language and Power in Sumatra. ऑक्सफर्ड विद्यापीठ. ISBN 983560035X. 
  2. रीड, अँथोनी (2005). An Indonesian Frontier: Acehnese and Other Histories of Sumatra. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर प्रेस. ISBN 9971692988. 
वैयक्‍तिक साधने