Jump to content

१९४८ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९४८ उन्हाळी ऑलिंपिक
XIV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर लंडन
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


सहभागी देश ५९
सहभागी खेळाडू ४,१०४
स्पर्धा १३६, १७ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै २९


सांगता ऑगस्ट १४
अधिकृत उद्घाटक राजा सहावा जॉर्ज
मैदान वेंब्ली मैदान


◄◄ १९४४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९५२ ►►

१९४८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची चौदावी आवृत्ती इंग्लंड देशाच्या लंडन शहरामध्ये जुलै २९ ते ऑगस्ट १४ दरम्यान खेळवली गेली. दुसरे महायुद्ध घडल्यामुळे १९३६ नंतर प्रथमच ऑलिंपिक स्पर्धा खेळवल्या गेल्या. ह्या स्पर्धेमध्ये ५९ देशांच्या ४,१०४ खेळाडूंनी भाग घेतला.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या प्रचंड आर्थिक हानीमुळे ह्या स्पर्धेसाठी कोणत्याही नव्या वास्तू बांधल्या गेल्या नव्हत्या.

सहभागी देश

[संपादन]
सहभागी देश

खालील ५९ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. एकूण १४ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये पराभूत झालेल्या जर्मनीजपानना आमंत्रण देण्यात आले नव्हते तर सोव्हिएत संघाने आपले खेळाडू पाठवले नाहीत. स्वतंत्र भारताची ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.


पदक तक्ता

[संपादन]
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका ३८ २७ १९ ८४
स्वीडन स्वीडन १६ ११ १७ ४४
फ्रान्स फ्रान्स १० १३ २९
हंगेरी हंगेरी १० १२ २७
इटली इटली ११ २७
फिनलंड फिनलंड २०
तुर्कस्तान तुर्कस्तान १२
चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया ११
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड १० २०
१० डेन्मार्क डेन्मार्क २०
११ युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम (यजमान) १४ २३

बाह्य दुवे

[संपादन]