जगातील सात आश्चर्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरातन काळातील सात आश्चर्ये (डावीकडून उजवीकडे, वरून खाली): गिझाचा भव्य पिरॅमिड, बॅबिलॉनच्या अधांतरी बागा, आर्टेमिसचे देऊळ, ऑलिंपिया येथील झेऊसचा पुतळा, हेलिकारनॅसिस येथील कबर, ऱ्होड्स बेटांवरील पुतळाअलेक्झांड्रिया येथील दीपस्तंभ

जगातील सात आश्चर्ये ही पृथ्वीवरील अद्भुत (व काही अंशी काल्पनिक) अशा नैसर्गिक किंवा बांधल्या गेलेल्या ठिकाणे/वास्तू ह्यांची यादी आहे.

पुरातन काळातील सात आश्चर्ये[संपादन]

पुरातन काळातील सात आश्चर्ये मध्ये खालील आश्चर्यांचा समावेश होतो.

आश्चर्य निर्मितीची तारीख निर्माणकर्ता वैशिष्ट्य नष्ट होण्याची तारीख नष्ट होण्याची कारणे
गिझाचा भव्य पिरॅमिड इ.स.पू. २५८४ ते २५६१ इजिप्तचे नागरिक खुफु राजाची कबर अजूनही अस्तित्वात
बॅबिलॉनच्या अधांतरी बागा इ.स.पू. ६०५-५६२ बॅबिलॉनचे नागरिक २२ मी (७५ फूट) उंचीच्या अधांतरी बागा, पाणी देण्यासाठी रहाट, छतावर मोठे मोठे वृक्ष इ.स.पू.च्या पहिल्या शतका नंतर भूकंप
ऑलिंपिया येथील झेऊसचा पुतळा इ.स.पू. ४६६-४५६(मंदिर) इ.स.पू. ४३५(पुतळा) ग्रीसचे नागरिक ४० फूट (१२ मी.) उंच. इ.स.चे ५ वे शतक-इ.स.चे ६ वे शतक माहित नाही, कदाचित आग किंवा भूकंप.
आर्टेमिसचे देऊळ इ.स.पू. ५५० लिडियाचे नागरिक बांधण्यास १२० वर्षे लागली इ.स.पू. ३५६(हेरोस्ट्रॉटस ने) इ.स. ४०९ (गॉथ लोकांनी) जाळपोळ, लूटालूट
हेलिकारनॅसिस येथील कबर इ.स.पू. ३५१ पर्शियाचे नागरिक, ग्रीसचे नागरिक ४५ मी (१३५ फूट) उंच, कबरींसाठीच्या मॉसोलम या प्रतिशब्दाच्या उत्त्पत्तीसाठी कारक इ.स. १४९४ भूकंपामुळे पडझड, व युरोपियन प्रवाशांनी केलेली नासधूस.
ऱ्होड्स बेटांवरील पुतळा इ.स.पू. २९२-२८० ग्रीसचे नागरिक हेलिऑस देवतेचा पुतळा, ३५ मी (११० फूट) उंच. इ.स.पू. २२६ भूकंप
अलेक्झांड्रिया येथील दीपस्तंभ इ.स.पू. २८० टोलेमी १३५ मी. (४४० फूट) उंच इ.स. १३०३-१४८० भूकंप

आधुनिक जगातील सात आश्चर्ये[संपादन]

मानवनिर्मित बांधकामे[संपादन]

आश्चर्य बांधकाम सुरुवात उद्घाटन स्थान
चॅनल टनेल डिसेंबर 1, 1987 मे 6, 1994 डोव्हरची सामुद्रधुनी
सी.एन. टॉवर फेब्रुवारी 6, 1973 जून 26, 1976 टोरॉंटो, कॅनडा
एम्पायर स्टेट बिल्डिंग जानेवारी 22, 1930 मे, 1931 न्यू यॉर्क शहर, अमेरिका
गोल्डन गेट ब्रिज जानेवारी 5, 1933 मे 27, 1937 सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका
इताइपू धरण जानेवारी 1970 मे 5, 1984 पाराना नदी, ब्राझिलपेराग्वे दरम्यान
डेल्टावेर्केन/ झॉयडरझीवेर्केन 1920 मे 10, 1997 नेदरलँड्स
पनामा कालवा जानेवारी 1, 1880 जानेवारी 7, 1914 पनामा

न्यू७वंडर्स यादी[संपादन]

२००७ साली जगभर झालेल्या मतदानातून खालील सात आधुनिक आश्चर्यांची निवड करण्यात आली.

आश्चर्य ठिकाण चित्र
चिचेन इट्झा मेक्सिको युकाटन, मेक्सिको एल कॅस्टिलो
ख्रिस्ट द रिडीमर ब्राझील रियो दि जानेरो, ब्राझिल
ख्रिस्ट द रिडीमर पुतळा
ख्रिस्ट द रिडीमर पुतळा
कलोसियम इटली रोम, इटली कलोसियम
चीनची भिंत चीन चीन चीनची भिंत
माचु पिच्चु पेरू कुझको, पेरू
माचु पिच्चु
माचु पिच्चु
पेट्रा जॉर्डन जॉर्डन
पेट्रा येथील कोषागार
पेट्रा येथील कोषागार
ताज महाल भारत आग्रा, भारत ताज महाल
गिझाचा भव्य पिरॅमिड इजिप्त कैरो, इजिप्त खुफूचा पिरॅमिड