आर्टेमिसचे मंदिर

आर्टेमिसच्या मंदिराचे, सध्याच्या तुर्कस्तानमधील एफसस येथे असणारे अवशेष. मंदिराच्या मूळ स्तंभाचे काही अवशेष एकावर एक रचून ठेवलेले सदर चित्रात दिसत आहेत. तसेच स्तंभावर पक्षाचे घरटेही दिसते. बाकी मंदिर त्याला लागलेल्या आगीत आणि काळाच्या ओघात नष्ट झाले.
आर्टेमिस ही ग्रीक देवता सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याची कन्या आणि आरोग्य व धनुर्विद्येचा देव अपोलो याची जुळी बहीण होती. इ.स.पूर्व सुमारे ५५० मध्ये हे मंदिर बांधले गेले. आर्टेमिसचे मंदिर प्राचीन जगतातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते.
अलेक्झांडर द ग्रेटच्या जन्मदिनी या मंदिराला आग लागून ते बेचिराख झाले. हे देउळ आधुनिक तुर्कस्तानात इफेसूस या प्राचीन शहराच्या साईट जवळ स्थित होते.आज ह्या देवळाची काही भग्नावशेष शिल्लक आहेत.