पोताला महाल

पोताला महाल (तिबेटी भाषा:ཕོ་བྲང་པོ་ཏ་ལ་)हा तिबेटच्या ल्हासा शहरातील दलाई लामांचे अधिकृत निवासस्थान होते. १९५९मध्ये दलाई लामांनी ल्हासा व तिबेट सोडल्यानंतर येथे संग्रहालय रचण्यात आले. या इमारतीस जागतिक वारसास्थानाचा दर्जा आहे.
याचे बांधकाम १६४५ साली सुरू झाले. याठिकाणी आधी ६३७ साली बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष होते. अंदाजे ४०० मी x ३५० मी असा आयताकृती आकाराच्या या महालाच्या संरक्षक भिंती ३-५ मी (९-१५ फूट) रुंदीच्या आहेत. याचे कोपऱ्यांमध्ये तांबे ओतलेले आहे जेकरून भूकंपांपासून ही इमारतीस सुरक्षित राहते.
या महालातील तेरा मजल्यांवर अंदाजे १,००० खोल्या, १०,००० छोटी देवळे आणि २०,००० मूर्त्या आहेत.
पोताला महालास पोताल्का पर्वताचे नाव दिले आहे. या पर्वतावर अवलोकितेश्वर बोधिसत्त्वांचा निवास असल्याचे मानले जाते.