स्टोनहेंज

स्टोनहेंज (इंग्लिश: Stonehenge) ही इंग्लंडच्या विल्टशायर काउंटीमधील एक प्रागैतिहासिक वास्तू आहे. सॉल्झब्री शहराच्या १३ किमी उत्तरेस स्थित असलेल्या स्टोनहेंजमध्ये अनेक मोठे दगड उभ्या स्थितीमध्ये वर्तूळाकार शैलीत रचले गेले आहेत. ही वास्तू अंदाजे इ.स. पूर्व ३००० मध्ये बनली असावी असा पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. स्टोनहेंजच्या निर्मितीचे किंवा बांधण्याच्या उद्देशाचे कोणतेही लिखित बनवले गेले नसल्यामुळे ही वास्तू नक्की कोणी व कशाकरिता बांधली ह्याबद्दल अनेक तर्क आहेत.
इ.स. १९८६ साली युनेस्कोने स्टोनहेंजचा जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला. २००७ साली घेण्यात आलेल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या कौलामध्ये स्टोनहेंजचा समावेश केला गेला होता परंतु त्याची सात आश्चर्यांमध्ये निवड झाली नाही.
बाह्य दुवे[संपादन]
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |