बैरूत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बैरूत
بيروت
Beyrouth
लेबेनॉन देशाची राजधानी

Beirut Central District Collage.jpg

Flag of beirut.gif
ध्वज
BlasonBeyrouth4.jpg
चिन्ह
बैरूत is located in लेबेनॉन
बैरूत
बैरूत
बैरूतचे लेबेनॉनमधील स्थान

गुणक: 33°53′13″N 35°30′47″E / 33.88694°N 35.51306°E / 33.88694; 35.51306गुणक: 33°53′13″N 35°30′47″E / 33.88694°N 35.51306°E / 33.88694; 35.51306

देश लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
क्षेत्रफळ २० चौ. किमी (७.७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ३,६१,३६६
  - महानगर २०,६३,३६३
प्रमाणवेळ यूटीसी+०२:००
http://www.beirut.gov.lb/


बैरूत (अरबी: بيروت; हिब्रू: ביירות; लॅटिन: Berytus; फ्रेंच: Beyrouth; तुर्की: Beyrut; आर्मेनियन: Պէյրութ) ही पश्चिम आशियातील लेबेनॉन देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बैरूत शहर लेबेनॉनच्या पश्चिम भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.

इ.स. पूर्व पंधराव्या शतकामधील उल्लेख सापडलेले बैरूत जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. सध्या बैरूत लेबेनॉनचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असून २०१२ साली बैरूतची लोकसंख्या ३.६१ लाख तर महानगराची लोकसंख्या २० लाकांहून अधिक होती. बैरूत हे लेबेनॉनमधील सर्वात मोठे पर्यटनस्थळ असून येथील सौम्य हवामान व समुद्रकिनारे अनुभवायला येथे अनेक पर्यटक येतात. परंतु वारंवार होत असणाऱ्या युद्धांमुळे व अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे बैरूतची अर्थव्यवस्था काहीशी कमकूवत बनली आहे.

भूगोल[संपादन]

बैरूत शहर एका नैसर्गिक द्वीपकल्पावर वसले असून त्याच्या पूर्वेकडून बैरूत नदी वाहते तर पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे. बैरूत इस्रायल-लेबेनॉन सीमेच्या ९४ किमी (५८ मैल) उत्तरेस स्थित आहे.

हवामान[संपादन]

बैरूतचे हवामान भूमध्य समुद्रीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे उबदार तर उन्हाळे कोरडे असतात.

बैरूत विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 27.9
(82.2)
30.5
(86.9)
36.6
(97.9)
39.3
(102.7)
39.0
(102.2)
40.0
(104)
40.4
(104.7)
39.5
(103.1)
37.5
(99.5)
37.0
(98.6)
33.1
(91.6)
30.0
(86)
40.4
(104.7)
सरासरी कमाल °से (°फॅ) 17.4
(63.3)
17.5
(63.5)
19.6
(67.3)
22.6
(72.7)
25.4
(77.7)
27.9
(82.2)
30.0
(86)
30.7
(87.3)
29.8
(85.6)
27.5
(81.5)
23.2
(73.8)
19.4
(66.9)
24.25
(75.65)
दैनंदिन °से (°फॅ) 14.0
(57.2)
14.0
(57.2)
16.0
(60.8)
18.7
(65.7)
21.7
(71.1)
24.9
(76.8)
27.1
(80.8)
27.8
(82)
26.8
(80.2)
24.1
(75.4)
19.5
(67.1)
15.8
(60.4)
20.87
(69.56)
सरासरी किमान °से (°फॅ) 11.2
(52.2)
11.0
(51.8)
12.6
(54.7)
15.2
(59.4)
18.2
(64.8)
21.6
(70.9)
24.0
(75.2)
24.8
(76.6)
23.7
(74.7)
21.0
(69.8)
16.3
(61.3)
12.9
(55.2)
17.71
(63.88)
विक्रमी किमान °से (°फॅ) 0.8
(33.4)
3.0
(37.4)
0.2
(32.4)
7.6
(45.7)
10.0
(50)
15.0
(59)
18.0
(64.4)
19.0
(66.2)
17.0
(62.6)
11.1
(52)
7.0
(44.6)
4.6
(40.3)
0.2
(32.4)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 190.9
(7.516)
133.4
(5.252)
110.8
(4.362)
46.3
(1.823)
15.0
(0.591)
1.5
(0.059)
0.3
(0.012)
0.4
(0.016)
2.3
(0.091)
60.2
(2.37)
100.6
(3.961)
163.8
(6.449)
825.5
(32.502)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.1 mm) 15 12 9 5 2 0 0 0 1 4 8 12 68
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 69 68 67 69 71 71 73 73 69 68 66 68 69.3
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 131 143 191 243 310 348 360 334 288 245 200 147 २,९४०
स्रोत #1: Pogodaiklimat.ru[१]
स्रोत #2: Danish Meteorological Institute (sun and relative humidity)[२]

वाहतूक[संपादन]

बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बैरूतमधील प्रमुख विमानतळ आहे. हा लेबेनॉनमधील सध्या चालू असलेला एकमेव विमानतळ असून २०१३ साली सुमारे ६२ लाख प्रवाशांनी येथून प्रवास केला. लेबेनॉनची जलवाहतूक बैरूत बंदर हे देशामधील सर्वात मोठे बंदर हाताळते.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: