ग्रेट बॅरियर रीफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्वीन्सलंडच्या पूर्वेकडील ग्रेट बॅरियर रीफ

ग्रेट बॅरियर रीफ हा जगातील सर्वात मोठा रीफसमूह आहे. रीफ ही समुद्रात पाण्याच्या पृष्ठभागाखाली विविध कारणास्तव तयार झालेली टेकडी होय. ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंड राज्याच्या पूर्व किनाऱ्याजवळ कॉरल समुद्रात स्थित असून त्यामध्ये सुमारे २,९०० रीफ व ९०० बेटांचा समावेश होतो. २,६०० किमी लांबवर पसरलेल्या ह्या रीफसमूहाने समुद्राचा ३,४४,४०० चौरस किमी इतका पृष्ठभाग व्यापला आहे.

ग्रेट बॅरियर रीफ हे संपूर्णपणे कॉरल ह्या उथळ समुद्रात आढळणाऱ्या सुक्ष्म जंतूंनी केलेल्या कॅल्शियम कार्बोनेटच्या उत्सर्गापासून तयार झालेले आहे. हे रीफ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थानजगातील सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.

ह्या रीफच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे स्कुबा डायव्हिंग हा पर्यटनउद्योग येथे सर्वात लोकप्रिय आहे.


गॅलरी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 18°17′10″S 147°42′00″E / 18.28611°S 147.70000°E / -18.28611; 147.70000