Jump to content

माया संस्कृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माया संस्कृती ही अमेरिका खंडातील एक प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने दक्षिण अमेरिका खंडात झाला. मेक्सिको देशाच्या खालील भागात पसरलेल्या प्राचीन शहरांचे भग्न अवशेष आढळून येतात. त्यांचा अभ्यास केल्यानंतर या संस्कृतीची अधिक माहिती मिळते.या संस्कृतीची अधिक माहिती मिळविण्यासाठी येथील प्राचीन स्थापत्य आणि लिपी यांचा अभ्यास महत्वाचा ठरला आहे . माया लिपी ही विकसित स्वरूपाची असून त्यातून या समाजाची प्रगल्भता लक्षात येते . कालदर्शिका , खगोलशास्त्र , कला , स्थापत्य , गणिती ज्ञान अशा विविध विषयात या संस्कृतीची प्रगती झाले असल्याचे संशोधनातून दिसून आलेले आहे .

इतिहास

[संपादन]

सध्याच्या दक्षिण पूर्व मेक्सिको प्रदेशात विशेषतः : ग्वाटेमाला , बेलीझ या प्रदेशात या संस्कृतीचा उदय झाला . या आणि जवळपासच्या प्रदेशातील नागरिक आजही माया संस्कृतीतील २८ पेक्षा अधिक बोलीभाषा दैनंदिन जीवनात वापरतात . आपले पूर्वज ज्या परिसरात निवास करीत होते बहुतांशी त्याच परिसरात आजच्या काळातील नागरिकांचे निवासस्थान असल्याचे दिसून येते .

विकास

[संपादन]

इसवी सन पूर्व २ ० ० ० या काळातील शेती आणि गावाची रचना येथे आढळून येते .इसवी सन पूर्व २ ० ०० ते इसवी सनोत्तर २ ५ ० या काळात स्थानिक शेतीचा विकास व त्याद्वारे धान्य निर्मिती तसेच सहनिवासासाठीच्या बांधकामाची निर्मिती झालेली आहे .इसवी सन पूर्व ७ ५ ० -५ ० ० या कालावधीत येथे मंदिरे , प्रार्थनास्थळे बांधली गेली आहेत . इसवी सनपूर्व तिस - या शतकात चित्र लिपीचा वापर तेथे सुरू झाला असून ही लिपी वाचण्यास कठीण आहे असे मानले जाते .इसवी सन २ ५ ० च्या काळात शिल्पाने युक्त स्थापत्यशैलीची सुरुवात झालेली दिसते . यानंतरच्या काळात सामूहिक निवासव्यवस्था बांधलेल्या आढळतात तसेच व्यापाराच्या निमित्ताने जोडली गेलेली शहरेही असल्याचे पुरावे सापडले आहेत .

राजकीय महत्व

[संपादन]
सहाव्या शतकातील राजाचे शिल्प

माया संस्कृतीमधे राजेशाही संकल्पनेला विशेष महत्व असल्याचे आढळून आले आहे . याची पुरावे स्थानिक स्थापत्यामधे दिसून येतात . राजा हा सर्वोच्च शासक मनाला जात असे . राजपद राजाकडून त्याच्या मोठ्या मुलाकडे हस्तान्तरित केला जात असे . यासाठी राजकुमाराच्या बालपणात विशेष संस्कारकृत्यांची आणि विधी विधानांची - योजनाही केली जात असे . राज्याभिषेक सोहळा दिमाखदार पद्धतीने संपन्न केला जात असे ज्यात विविध धार्मिक , सांस्कृतिक आणि सामाजिक कृत्यांचा समावेश असे .

हे सुद्धा पहा

[संपादन]

नोंदी

[संपादन]

अधिक वाचने

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]